" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."
000o000
" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलंबाळं, नोकरी , पत, प्रतिष्ठा, पैसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान..... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे. व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरू. अशा एकटेपणात ज्या माणसांकडे त्याचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या ' ने रे पांडुरंगा ' आरोळ्या सुरू होतात."
वपुर्झा /101/Surendra /23022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा