"प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही"
000o000
" अपेक्षाभंगाचा क्षण, झटका ह्यांहून वेगळा असतो का? आयुष्य आजवर किती जगलो, ह्या आकडेमोडीत काही अर्थ नाही. प्रकाश आणि अंधाराचा खेळ कॅलेंडरवरच्या चौकोनासाठी. आपल्या आयुष्याच्या वाटेवर कायम अंधारच असतो. क्षणाला क्षण घट्ट चिकटून असतांनाही पुढच्या क्षणी काय घडणार आहे, हे आपल्याला माहीत नसणं म्हणजे अंधारच नव्हे काय? जेवता - जेवता ठसका लागण, चालतांना ठेचं लागण, इतक्या किरकोळ बाबीपासून, एखाद्याने पत्नीला चहा करायला सांगणं एक कप चहा तयार व्हायच्या आत त्याने जगाचा निरोप घेणं इतक्या घटनांपर्यंत, पुढचा क्षण अद्यात असतो. अपेक्षाभंगाचा क्षण हा प्रकाशाचा किरण. आपण अंधारातून चालत आहोत, ह्याची जाणीव हा किरण करून देतो. प्रकाशाचा हा किरण धरून ठेवता येणं हीं इतर अनेक कलापैकी श्रेष्ठ कला, पण ती कला आहे, हेच आपल्याला ज्ञात नाही. म्हणूनच आपण तेवढ्यापुरते सावध होतो आणि पुन्हा अंधारातली वाटचाल चालू ठेवतो.
वपुर्झा /Surendra /01022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा