"संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी."
000o000
" संसार बुद्धिमत्तेच्या जोरावर होत नाही नेहमी. तो होतो भक्तीतून, प्रेमातून. प्रेमाचा उगम मनात असतो. भक्तीने संसार करणाऱ्या स्त्रीने वैवाहिक जीवनातला प्रत्येक क्षण संसार आणि नवरा यासाठी जपलेला असतो. तिने स्वतःच निराळ अस्तित्व मानलेल नसतं. तिच्या साथीदारासाठी तिचा सतत त्याग चाललेला असतो. तो त्याग तिच्या साथीदाराने ओळखुन तिला सतत 'दाद ' द्यावी एव्हडीच तिची एकमेव इच्छा असते. आणि मग तेव्हड्याचसाठी तिला प्रेमात भागीदार नको असतात. आपला माणूस कायम आपलाच राहावा हीं पत्नीची भावना पण स्वाभाविकच. "
वपुर्झा /38/Surendra /11022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा