बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

" कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

                                 000

                "  आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष सोडूनच द्यायची. कोणत्या कुटुंबात जन्म, कोणतं गाव, कोणती शाळा, शिक्षक, प्राध्यापक, यश, व्यवसाय, आयुष्याचा साथीदार........ प्रत्येकाने मागे वळून पाहिलं तर हीच स्टेशन'. पण इलाखे वेगवेगळे. आणि मग मर्यादांनी वेढलेल्या ह्या प्रवासात, एका माणसाला अनुभव येऊन येऊन किती येणार? आयुष्यात किती माणसं भेटणार? त्यातली साधी किती? सोज्वळ किती? मिडिऑकर किती? विद्वान पण आढयताखोर किती? असे अनेक प्रश्न मला पडतात आणि तरीसुद्धा वाटतं, विचारांचा मागोवा घेण्याचा ज्यांना ज्यांना छंद आहे त्या सगळ्यांना ज्ञानभाराने नम्र झालेला एक तरी महाभाग भेटला असेलच. विचारांचाच मागोवा घेणारे समाजात किती लोक आहेत, हा प्रश्न बाजूला ठेवणे भाग आहे. पण अशी विनम्र असलेली, ज्ञानी माणसं, सगळीच्या सगळी भेटणं अशक्य. मलाच असं नव्हे, तर कोणत्याही एका व्यक्तीला. कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. असं केलं तरच            ' व्यक्ती ' च्या गावापासून  ' व्यक्तिमत्ववा ' च्या महानगरी पर्यंतचा प्रवास होतो. निग्रहाचे लगाम सोडले की आश्वाचा.   ' वारू ' होतो. ' वारू ' आणि ' वारा ' ह्यांचं एक नातं असावं. ते कोणत्याही दिशेने जातात. "

वपुर्झा /218/Surendra / 03092025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा