गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

" बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो."

" बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो."

                                 000

                "  प्रत्येक माणसाची आयुष्यभर एकच धडपड असते. आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळी प्रतिमा समाजात उमटावी. एक काळ असा होता की, समाजात व्यसनी माणसाचं प्रमाण अत्यल्प होत. क्वचित कोणी ड्रिंक्स घेतही असत. त्याचा बाजार झाला नव्हता. आपल्या घरातील जेष्ठ मंडळीं ड्रिंक्स घेतात हे घरातल्या गावीही नव्हतं. मग समाजातल्या प्रतिमेला घक्काही लागायचं कारण नव्हतं. आज घरातल्या सहा-सात वर्षाच्या बालगोपालांनाच सोड्याच्या बाटल्या आणण्यासाठी पिटाळलं जातं. पाहुण्यांना कौतुकाने सांगितलं जातं, ' ही इज व्हेरी स्मार्ट, रस्ता परफेक्टली क्रॉस करतो.' बालगोपालही स्मार्टली स्वतःसाठी फ्रुटी आणतात. बाप त्याला ' टीप ' देतो.

वपुर्झा /217/Surendra / 28082025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा