बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

                                 000

                  '   एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचांत जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजते. जी व्यक्ती मनानें जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने रया वातावणावर उपाय हवाअसतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भानात्मक ताणतणावाची तितक्याच  लहरीवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही  तेव्हडीच बेचैन आहे एव्हढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणं आणि चार भिंतीच्या घरकुलात तसा हात न मिळणं इथंच कुठेतरी वाळ्वी लागली आहे, ह्याची साक्ष आहे. घरकुलाच्या बांधकामत कुठंतरी ओल आहे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही सांगतो की भिंतीत ही अशी ' ओल ' नक्की कोठून येते, हे शोधणे अशक्य असत. पूनर्बंधणी करणं हाही इलाज योग्य ठरत नाही. एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एक वेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या        तंत्रज्ञाना कळत नाही. तशी एखादी व्यथा-रुखरूखीची पाळमुळं किती खोलवर गेलेली आहेत, ते उकळत नाही. मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

वपुर्झा /240/Surendra / 10092025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा