" विचार शृंखला "
1) ' कायम विवाद्य विषय कोणता असेल तर तो म्हणजे पाऊस. तो पडो आथवा न पडो, केव्हाही पडो, कितीही कोसळो, कसाही येवो, तो कायम टिकेचाच विषय झालाय. पुरुष आणि पाऊस, त्यापेक्षा नवरा आणि पाऊस ह्या दोघांनी नक्की कसं वागावं हे त्या दोघांनाही ठरवता येणार नाही आणि इतरांनाही सांगता येणार नाही. ' अर्ध्या वचनात ' ची अपेक्षा आपण कुणाकडून करीत नाही? साहेब, नोकर, भावंड, मुलं, आणि नवरा, सगळे अर्ध्या वचनातलेच हवेत. पुरुष कसेही असोत, त्यांचे ' नवरे ' झाले की ते अर्धा वचनात हवेत. "
वपुर्झा /256/Surendra / 15092025
---------------------------------------------------------2) " बोलायला कोणी नसणं ह्या शोकांतिकेपेक्षा, आपण बोललेलं समोरच्या माणसापर्यंत न पोचण ही शोकांतिका जास्त भयाण. "
वपुर्झा /257/Surendra / 15092025
-----------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा