" विचार शृंखला: 21,22,23/20092025 "
21). मैत्री, विवाह, संसार ह्यांचा प्रारंभ जसा होतो, तसाच त्यांचा शेवट अपेक्षेप्रमाणे होतं नाही. आयुष्य ही एक अज्ञात यात्रा आहे. भाग्योदयासाठी आपण जो प्रारंभ करतो, त्याचा शेवट भाग्यातच होतो, असं नाही. असं का होतं? आपल्या बरोबर आपल्या जीवन-यात्रेबरोबरच एक अज्ञात शक्ती ही प्रवास करीत असते. त्या शक्तीनेही एक हातचा राखून ठेवलेला असतो, हे आपल्याला माहीत नसतं. "
वपुर्झा/Surendra/20092025
Ooo
22). " प्रत्येक नव्या अनुभवाचं नातं, अंगावर काटा किंवा रोमांच उठवणाऱ्या केवळ एकाच क्षणाशी असतं. दुसऱ्याच पुढच्या क्षणी तो अनुभव एका क्षणाने जुना झालेला असतो. भूतकाळात गेलेला असतो. नंतरचा आनंद पुनःरूक्तीचा असतो. ' क्षणभंगूर ' हे विशेषण आयुष्याला न लावता अनुभवालाच लावलं पाहिजे. "
वपुर्झा/Surendra/20092025
23). " संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना, सुखाच्या जागा, सुखाची साधन ही वयानुसार, कालानुसार निरनिराळी असतात. आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पळतोही. पण संसार टिकतो तो कसा? तर दुःख जेव्हा सगळ्यांच एकच होतं, तेव्हा घर उभं राहतं."
वपुर्झा/Surendra/20092025
-----------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा