" विचार शृंखला: 33/34/35/36 :28092025 "
33) " ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो, तो वेळ साधतो. ". वपूर्झा/ Surendra/28092025. Ooo. 34) " सुविचारांची वही नंतर शोभेची वस्तू होते. ". वपुर्झा/Surendra/28092025. Ooo. 35) " सकाळचे जाग आल्याबरोबरचे क्षण नेहमीच शुद्ध असतात. निर्लॅप असतात. दिवसांच्या कारस्थांनाचा, कपटांचा, खोटेपणाचा थर त्यावर चढलेला नसतो. " वपुर्झा/Surendra/28092025. Ooo. 36). " गादी-उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटणीला आली नाही तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाही हो रात्रभर. रात्र वैरीण नसते. सवय वैरीण. आणि तिला जन्म देणारे आपणच. "वपुर्झा/Surendra/28092025. Ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा