" पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "
000
' ' विचार करा ' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे. हे जर तुम्हाला स्वतःला पटलं तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या ' प्रयोरिटीज ' बदलतील. त्यांचही मग स्वागत करा. ' नोकरीं ' की ' अपत्य ' ह्यातही अग्रहक्क कशाला हे ठरवणं आलं. हा सगळा तिढा अवघड का? तर ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकरीधर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्यप्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाही. तिथंही ' प्राप्ती ' हा शब्द प्रथम लिहायचा की ' अपत्य '? अपत्य आणि प्राप्ती दोन्ही साधायचं म्हणजे मूल नोकराकडे किंवा सासू- ' unwilling guardian की willing? अपत्य झाल्यावर हे कळणार. नाहीतर मग शेजारी, थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लाला ' आई ' सोडून कुणीही. बाप परकाच असतो. ' श्त्री ' ही क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता असं एक वचन, हयाउलट ' पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंतकाळचा..... ' मोकळ्या जागेत, पुरुष पिता खऱ्या अर्थानें झाला तर, नाहीतर पती, dictator जो शब्द असेल तो. शाळा, अभ्यास, संगोपन सुश्रुषेबरोबर नोकरीं. त्यातही श्त्रीला म्हणजे बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपत? पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "
वपुर्झा /238/Surendra / 09092025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा