" विचार शृंखला: 18,19,20 "
18) " स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्रच देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्द मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर मनाच्या अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निःशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत. "
19) " काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. "
20) " शत्रूची व्याख्या काय? : शतृत्व पैदा होण्यासाठी प्रथम परिचय हवा. त्याच मैत्रीत रूपांतर व्हायला हवं. मग केव्हातरी किरकोळ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून मतभेद किंवा ' अतिपरीचयात अवज्ञा ' असे शत्रूत्वाचेही टप्पे असतात. "
वपुर्झा/Surendra/19092025
Ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा