गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 24/25/26 :25092025 "

   " विचार शृंखला: 24/25/26         :25092025 "

  24)      " समोरच्या चालत्या-बोलत्या माणसांशी जितके छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एव्हडं माणूस नक्की सांभाळू शकतो. "वपुर्झा/Surendra/25092025.                Ooo.                                                        25).       " तुमचे-आमचे पूर्वज दारिद्र्याला घाबरले नाहीत. तुम्ही पण घाबरू नका. तुमच्या वाट्याला, इतरांचे वैचारिक दारिद्र्य पचवणं आले आहे. तेही पचवून दाखवा. सातत्य हा निसर्गाचा धर्म नाही. तेव्हा ढोगयुग संपेल. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्या सहवासात जी माणसं येतात, तेव्हढच जग नाही. हे जग अजुन चाललंय. ह्याचा अर्थच हा की इथं चांगलं जास्त आहे वाईट कमी      आहे. ".            वपुर्झा/Surendra/25092025.             26).      "   चेहरा म्हणजे भावना. डोळे म्हणजे शब्दातील भाव. स्पर्श्यांच्या-मोहाच्या राजधानीकडे नेणारी वाट. नजर चुकवली की पुढचा बराचसा प्रवास थांबवता येतो. मुक्कामाचा अखेरचा टप्पा टाळता येतो. "पुर्झा/Surendra/25092025.                     Ooo



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा