शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

" विचार शृंखला: 30/31/32 :27092025 "

" विचार शृंखला: 30/31/32        :27092025 "

30)  " मूल पाच वर्षाचं होईतो त्याला फारसं कळत नाही म्हणून त्याला विक्षिप्त म्हणायचं. नंतर दहा वर्षापर्यंत ' वाढतं वय ' म्हणून मुलांचं वागणं सहन करायचं. नंतरच वय धड ना बाल्य ना तारुण्य म्हणून हेकटपणाने वागण्याचा काळ. मग' ' तारुण्याची धुंदी ' म्हणून वेगळं वागणं. मग स्वभाव पक्का बनला म्हणून तो असेल तो स्वीकारायचा. असं म्हणता म्हणता, ' आता एव्हड्या उशिरा, हया वयात त्याचा स्वभाव बदलणं कसं शक्य आहे? ' हे म्हणायची पाळी येते. कोणत्या वयाची हमी  घ्यायची? '.      वपूर्झा/ Surendra/27092025.                   Ooo.                                                        31).   "   ' वियोग ' झाल्यावर माणूस का रडतो माहीत आहे? ', ' ते फक्त वियोगाच दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात, त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणीवेचं दुःखही त्यात असतं. त्याशिवाय जीवघेण्या यातनाही त्यात असतात. ज्याच्या साठी आपण रडतो, नेमकी तीच व्यक्ती वगळून, आपण किती दुःख करीत आहोत अशा अनेकांना ते नुसतं दिसतं. ज्याच्यापर्यंत ते दुःख, अश्रू तसेच्या तसे पोचले असते तोच तिथं उपस्थित नसतो. ' तुम क्या जाने, तुम्हारी यादमे हम कितने रोये ' हेच खरं. "वपुर्झा/Surendra/2792025.              Ooo.                                                           32).   "   आपल्याला न आवडणारे विचारही आपल्यावर हुकमत गाजवून जातात. "वपुर्झा/Surendra/27092025.                     Ooo


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा