" मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."
ooo
' मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं. आयुष्य आहे तोपर्यंत जगायला हवं, असं तर प्रत्येकजण म्हणतो तरी देखील जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. सामान्यातली सामान्य माणसंही ' मुलांचं शिक्षण होऊ दे, मग नोकरीं, टाळक्यावर आता चार अक्षता पडू देत आणि शेवटी नातवाचं तोंड पाहू दे ' ह्यासारखी चाकोरीबद्द अटळ प्रयोजनं आणि प्रलोभनं शोधत असतात. चाकोरी सतत ' कोरी ' ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या माणसांची काहीच चूक नाही. मुलाबाळांनी भरलेला संसार हा ज्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवट आहे त्याचा स्वीकार केल्यावर वेगळं आयुष्य वाट्याला कसं यावं? त्यातही सत्तर ते ऎशी टक्के लोकांना प्रयोजन शोधण्याची गरजच वाटत नाही. Survival for Existence ह्यातच त्यांची इतकी शक्ती खर्च होत असावी की जरा मान उंच करून, दृष्टी पल्याड न्यावी, काही वेगळ्या दिशेचा शोध घ्यावा ह्याची त्यांना भूक नसते. जाणीव नसते. अपुऱ्या जागेत फळीवरचा छोटासा देव्हारा त्यांना आपल्यासाठी पुरतो आणि वर्षाकाठी सत्यनारायणाची पूजा, उरलेल्या ' अंरिअर्स ' साठी बास होते. सर्व विपरीत घटनां ची उत्तर ' प्रारब्ध ' ह्या शब्दात त्यांना मिळतात. ही तमाम जनता सुखी. पण ह्यापलीकडे थोंडी जास्त जिज्ञासा जागी झाली, आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरु झाली की, न संपणारी प्रश्नमाला सुरु. "
वपुर्झा /243/Surendra / 11092025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा