शनिवार, १३ सप्टेंबर, २०२५

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."

"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही."                           

                             ooo

                  '   नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य       स्वतःपुरतं चिरंजीव होत. करमणूक करवून घेतांनाही स्वतःला खर्ची घातल्या शिवाय ती करमणूक भिनत नाही. ' साहित्य हे केवळ चुन्या सारखं असत.' त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याच पान रंगत नाही.' 

वपुर्झा /258/Surendra / 13092025

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

" मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."

"     मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं."                                  

                             ooo

                  '   मूळ जगण्याचं प्रयोजन शोधायला हवं. आयुष्य आहे तोपर्यंत जगायला हवं, असं तर प्रत्येकजण म्हणतो तरी देखील जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. सामान्यातली सामान्य माणसंही  ' मुलांचं शिक्षण होऊ दे, मग नोकरीं, टाळक्यावर आता चार अक्षता पडू देत आणि शेवटी नातवाचं तोंड पाहू दे ' ह्यासारखी चाकोरीबद्द अटळ प्रयोजनं आणि प्रलोभनं शोधत असतात. चाकोरी सतत ' कोरी ' ठेवण्याचा प्रयत्न करतात. ह्या माणसांची काहीच चूक नाही. मुलाबाळांनी भरलेला संसार हा ज्या प्रवासाचा प्रारंभ आणि शेवट आहे त्याचा स्वीकार केल्यावर वेगळं आयुष्य वाट्याला कसं यावं? त्यातही सत्तर ते ऎशी टक्के लोकांना प्रयोजन शोधण्याची गरजच वाटत नाही. Survival for Existence ह्यातच त्यांची इतकी शक्ती खर्च होत असावी की जरा मान उंच करून, दृष्टी पल्याड न्यावी, काही वेगळ्या दिशेचा शोध घ्यावा ह्याची त्यांना भूक नसते. जाणीव नसते. अपुऱ्या जागेत फळीवरचा छोटासा देव्हारा त्यांना आपल्यासाठी पुरतो आणि वर्षाकाठी सत्यनारायणाची पूजा, उरलेल्या ' अंरिअर्स ' साठी बास होते. सर्व विपरीत घटनां ची उत्तर ' प्रारब्ध ' ह्या शब्दात त्यांना मिळतात. ही तमाम जनता सुखी. पण ह्यापलीकडे  थोंडी जास्त जिज्ञासा जागी झाली, आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड सुरु झाली की, न संपणारी प्रश्नमाला सुरु. "

वपुर्झा /243/Surendra / 11092025

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

" मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

                                 000

                  '   एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचांत जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजते. जी व्यक्ती मनानें जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने रया वातावणावर उपाय हवाअसतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भानात्मक ताणतणावाची तितक्याच  लहरीवर दुसऱ्या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही  तेव्हडीच बेचैन आहे एव्हढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणं आणि चार भिंतीच्या घरकुलात तसा हात न मिळणं इथंच कुठेतरी वाळ्वी लागली आहे, ह्याची साक्ष आहे. घरकुलाच्या बांधकामत कुठंतरी ओल आहे. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असूनही सांगतो की भिंतीत ही अशी ' ओल ' नक्की कोठून येते, हे शोधणे अशक्य असत. पूनर्बंधणी करणं हाही इलाज योग्य ठरत नाही. एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एक वेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या        तंत्रज्ञाना कळत नाही. तशी एखादी व्यथा-रुखरूखीची पाळमुळं किती खोलवर गेलेली आहेत, ते उकळत नाही. मानसोपचार तज्ञ त्यांचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याच उच्यटन करू शकत नाहीत. "

वपुर्झा /240/Surendra / 10092025

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

"पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

" पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

                                 000

                  '  ' विचार करा ' तुमच्या नोकरीची तुमच्या संसाराला नितांत गरज आहे. हे जर तुम्हाला स्वतःला पटलं तर तो जीवनक्रम खळखळ न करता स्वीकारा. त्यानंतर सगळ्या ' प्रयोरिटीज ' बदलतील. त्यांचही मग स्वागत करा. ' नोकरीं ' की ' अपत्य ' ह्यातही अग्रहक्क कशाला हे ठरवणं आलं. हा सगळा तिढा अवघड का? तर ह्या वेगवेगळ्या पातळीवरच्या डिमांड्स आहेत म्हणून. नोकरीधर्म श्रेष्ठ की मातृत्वाची भावना? प्राप्ती की अपत्य? अपत्यप्राप्ती हा मग एकच शब्द उरत नाही. तिथंही ' प्राप्ती ' हा शब्द प्रथम लिहायचा की ' अपत्य '? अपत्य आणि प्राप्ती दोन्ही साधायचं म्हणजे मूल नोकराकडे किंवा सासू- ' unwilling guardian की willing? अपत्य झाल्यावर हे कळणार.  नाहीतर मग शेजारी, थोडक्यात म्हणजे त्या निष्पाप पिल्लाला  ' आई ' सोडून कुणीही. बाप परकाच असतो. ' श्त्री ' ही क्षणाची पत्नी, अनंतकाळची माता असं एक वचन, हयाउलट ' पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंतकाळचा..... ' मोकळ्या जागेत, पुरुष पिता खऱ्या अर्थानें झाला तर, नाहीतर पती, dictator जो शब्द असेल तो. शाळा, अभ्यास, संगोपन सुश्रुषेबरोबर नोकरीं. त्यातही श्त्रीला म्हणजे बायकोला नवऱ्यापेक्षा पगार जास्त असला तर किती नवऱ्यांना खपत? पुन्हा ' नोकरीचा रुबाब दाखवू नकोस ' ही अरेरावी आहेच. "

वपुर्झा /238/Surendra / 09092025

शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

" कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

                                 000

                  '  शी: शी:! किती गलिच्छ विचार आहेत तुमचे? ' "  गलिच्छ म्हण किंवा आणखी कोणतेही नाव दे. पण विचार तेव्हडेच खरे आहेत. माणसं माणसांना वापरतात. राज्यकर्ते जनतेला वापरतात. फार कशाला एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला वापरत. आईबाप मुलांना वापरतात. मुलंही नंतर तेच करतात. नाहीतर ज्यांचा उपयोग संपलेला आहे अशा आईवडिलांची वार्धक्यात सासेहोलपट झाली नसती. कुणी भावनात्मक गरज भागवण्या साठी, कुणी सुरक्षितपणाच्या नावाखाली, कुणी केवळ आर्थिक लाभासाठी, तर कुणी फक्त विकृत आनंद शमविण्यासाठी, कारण वेगवेगळी असतात, पण माणसं एकमेकांना वापरतात. "

वपुर्झा /238/Surendra / 06092025

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

" जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा "

                                 000

                "  लोकशाही तत्व म्हणून ठीक आहे, पण देशाचा कारभार करायचा म्हणजे शिस्तीचा बडगा हवाच. जिथे संस्कारच नसतात तिथे बडगाच हवा. आपल्या घरातल्या घरात ज्यांना आपण रक्ताचे नातेवाईक मानतो तिथेसूद्धा काहीं गोष्टी मनासारख्या व्हायला हव्या असतील तर घर चालविणाऱ्या माणसाला अघूनमधून रुद्रावतार घारण करावाच लागतो. आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला किंवा आईवडिलांना आपण अमुक तऱ्हेने वागलो तर आनंद होणार आहे, गैरसोय होणार नाही, ह्या समजूतीने वागणारी माणसं फार थोडी. अनेक घरांतून स्वतःचेच नातेवाईक सांगूनसुद्धा ऐकत नाहीत. असं का घडत असावं? आणि तेही स्वतःच्याच माणसांकडून? कारण झोडगिरीने वागलं तरी ते खपहून घेतलं जातं ह्याची खात्री आहे म्हणून. ह्याचं वृत्तीने देशातली माणसं    वागतात. "

वपुर्झा /223/Surendra / 05092025

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

" महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद."

                                 000

                "  कथाकथनचा कार्यक्रम संपल्यावरचे क्षण कसे असतात? हे आयुष्यातले शून्य क्षण. मुक्त क्षण नव्हेत. शून्यातूनच सगळं निर्माण झालं म्हणतात. पण हे निर्मितीक्षम शून्य नव्हे, हे तुम्हाला उजाड, एकाकी, पोरकं करणार शून्य. तुमच्यावर जिवाभावाने, उत्कटतेने तुटून पडणारं कुणीतरी सानिध्यात असणं ही त्या शून्याची गरज. त्याने काही बोलू नये, काही सांगू नये, काही विचारू नये. स्तुती नको, कार्यक्रमाचं कौतुक नको, त्याने फक्त असावं. कधी कधी काहीच नसतं. आपण फक्त असतो. कधी कधी हे क्षण चिरंतन स्वरूपाचे पण स्वतःचीच साधना नसल्यामुळे, उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे करतात. हे सगळं काय आहे?,  का आहे?, कधी सुरु झालं?, कधी संपणार?, मागं काय उरणार?, किती काळ उरणार?, वरवरची उत्तर तयार असतात. हे सगळं काय आहे ह्याचं आकलन तुला होणारच नाही. तू गप्प रहा. का आहे? - सांगता येणार नाही. कारण तू ह्याचा निर्माता नाहीस. हे कधी सुरु झालं?- तुझ्या जन्मापासून हे सुरु झालं. महापालिकेच्या पिवळ्या कागदावर तुझी जी जन्मतारीख आहे, तो जन्म नव्हे, ती केवळ तू कायद्याने  ' सज्ञान ' कधी झालास ह्याच्या तपासणी साठी आवश्यक असलेली नोंद. त्यातला ' सज्ञान ' हा शब्द संपूर्ण अज्ञान दर्शविणारा. कॅलेण्डरवरचे छापील चोकोन मागे पडल्याने माणूस सज्ञान होतो काय? ज्या दिवशी तुझ्या जाणीवांचा प्रारंभ झाला तो तुझ्या जन्म. तो दिवस टिपता येईल? नो. नेमक्या कोणत्या दिवशी गर्भ राहिला हेही सांगता येतं नाही. तरीही समज, जाणिवा जाग्या झाल्या त्या दिवसापासून हे चक्र फिरू लागलं. कधी संपणार?- तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. मागं काय उरणार?, काही नाही. तुझ्या पश्चात तुझं अस्तित्व किती?, इतरांच्या जाणिवा जितके दिवस राहतील तितके दिवस. कदाचित तुझं अस्तित्व तुझ्या हयातीतच संपल्याच तुला पहावं लागेल. " 

वपुर्झा /222/Surendra / 04092025

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

" कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. "

                                 000

                "  आयुष्यातली पहिली पंचवीस वर्ष सोडूनच द्यायची. कोणत्या कुटुंबात जन्म, कोणतं गाव, कोणती शाळा, शिक्षक, प्राध्यापक, यश, व्यवसाय, आयुष्याचा साथीदार........ प्रत्येकाने मागे वळून पाहिलं तर हीच स्टेशन'. पण इलाखे वेगवेगळे. आणि मग मर्यादांनी वेढलेल्या ह्या प्रवासात, एका माणसाला अनुभव येऊन येऊन किती येणार? आयुष्यात किती माणसं भेटणार? त्यातली साधी किती? सोज्वळ किती? मिडिऑकर किती? विद्वान पण आढयताखोर किती? असे अनेक प्रश्न मला पडतात आणि तरीसुद्धा वाटतं, विचारांचा मागोवा घेण्याचा ज्यांना ज्यांना छंद आहे त्या सगळ्यांना ज्ञानभाराने नम्र झालेला एक तरी महाभाग भेटला असेलच. विचारांचाच मागोवा घेणारे समाजात किती लोक आहेत, हा प्रश्न बाजूला ठेवणे भाग आहे. पण अशी विनम्र असलेली, ज्ञानी माणसं, सगळीच्या सगळी भेटणं अशक्य. मलाच असं नव्हे, तर कोणत्याही एका व्यक्तीला. कर्तृत्वाला प्रयत्नांचे अश्व जुमपायचे असतात. एकच दिशा ठरवायची असते. निग्रहाचे लगाम हातात ठेवायचे असतात आणि सातत्याचा चाबूक स्वतवरच उगारायचा असतो. असं केलं तरच            ' व्यक्ती ' च्या गावापासून  ' व्यक्तिमत्ववा ' च्या महानगरी पर्यंतचा प्रवास होतो. निग्रहाचे लगाम सोडले की आश्वाचा.   ' वारू ' होतो. ' वारू ' आणि ' वारा ' ह्यांचं एक नातं असावं. ते कोणत्याही दिशेने जातात. "

वपुर्झा /218/Surendra / 03092025