" म्हणून आपण जगतो "
000o000
' आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्द्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज मृत्युला कवटाळाव अस वाटत नाहीं '
वपूर्झा / 077/Surendra /31122024
" म्हणून आपण जगतो "
000o000
' आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही, म्हणून आपण जगतो. उद्द्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज मृत्युला कवटाळाव अस वाटत नाहीं '
वपूर्झा / 077/Surendra /31122024
" मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे "
000o000
' इट जस्ट हॅपन्स ' म्हणत पुढच्याच क्षणी जी माणस कामाला लागतात, ती जास्त जगतात. अश्रू गाळण्यात आपल वीस टक्के आयुष्य वाया जात असेल. काही माणसांचं तितके टक्के आयुष्य इतरांच्या नावाने बोटं मोडण्यात जातं. पुढच्याच क्षणी मागचा क्षण विसरणारे अलिप्त, कृतघ्न, वास्तववादी, की हे सगळे समर्थांचे शिष्य ? 'मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही, पुढे जात आहे ' -- अकरा शब्दात समर्थांनी सगळ उकलून दाखवलं.
वपूर्झा / 088/Surendra /29122024
'मानवंदना मिळायची ती युनिफॉर्म मधल्या आतल्या माणसाला"
000o000
' सेवानिवृत्ती नंतर अनेकांची अवस्था बघवत नाही. कुत्र विचारत नाहीं नंतर. पण काही माणसांचा मान टिकतो. पूर्वीइतकाच. कारण ते अधिकार पदावर असताना सोसायटीने त्यांना जेव्हा सलाम केला, तेव्हा तेव्हा तो खुर्चीला नव्हता आणि युनिफॉर्मलाही नव्हता. ती मानवंदना मिळायची ती युनिफॉर्म मधल्या आतल्या माणसाला. काही माणस खुर्चीचा आणि युनिफॉर्मचा उपयोग फक्त दरारा बसविण्यासाठी, फायद्यासाठी करतात. त्यांची घर शांत तृप्त असतात. वाममार्गाने पैसा मिळवायला कधी कधी आम्ही बायकाच नवऱ्यांना भरीस पडतो. ऐषआरामाचा आम्हाला प्रथम मोह होतो, तो स्पर्धेतून, नथिंग एल्स '
वपूर्झा / 090/Surendra /27122024
" चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का?
000o000
चांगलं आणि वाईट ह्या शब्दांना स्वतंत्र अर्थ आणि अस्तित्व असत का? ' हो ' आणि ' नाही ' ही. ' तुलना ' नावाची राक्षसीण जोपर्यंत मध्ये उभी राहत नाही तोपर्यंत ह्या शब्दांचा विहार चालतो. तिने हस्तक्षेप केला की संपल ! ही राक्षसीण येतांना एकटी येत नाही. तिच्याबरोबर तिची बहीण येते. ती तुम्हाला बहिणीच्या स्वाधीन करते आणि दुसऱ्या मनाचा बळी घेण्यासाठी ती निघून जाते. ह्या बहिणीच नाव ' तडजोड '. ही तुम्हाला आयुष्यभर साथ देते.
वपूर्झा / 094/Surendra /26122024(२)
" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. "
000o000
' मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या - पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचवा म्हणून केलेल्या प्रार्थंनांशी त्यांचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.'
वपूर्झा / 095/Surendra /26122024
" तुमचं सगळ बालपण दुःखाने भरलेलं होत, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? "
000o000
प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसर बालपण जगण्याची संधी मिळवून देत आणि काळाबरोबर पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृध्द करत. जनरेशन गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा, आपण आपल बालपण नव्याने अनुभवावं, अशी वृत्ती असते, तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडवास वाटत. तुमचं सगळ बालपण दुःखाने भरलेलं होत, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो?
वपूर्झा / 096/Surendra /25122024
" स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ?"
000o000
स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचौघात आपल्या मित्रांशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधर्मियांच्या शोधात असतो. Birds of the sane feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपल वर्तन कस होत आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकल तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटल तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो.
वपूर्झा / 101/Surendra /24122024
"आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत "
000o000
यांत्रिक हालचालीने हसता येतं. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हे. ' ह्या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात ' अस कुणी म्हटल, तर नव्याने प्रसन्न कुठे वाटते?' आणि रडतांना कुणी फोटो काढत नाहीत. रडण भोगायच असत. हसण उपभोगायचं असत. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.
वपूर्झा / 104/Surendra /2312024
" गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही. "
000o000
धोबीघाटावर धबाधबा कपडे आपटणाऱ्या एखाद्या धोब्यापेक्षा क्राइम ब्रांचचा ऑफिसर वेगळा असायला हवा. धोबिघाटापेक्षा खुबीघाटावर समोरच्या माणसाला बोलत करायला हवं. मार खाण, हा त्या लोकांचं प्रारंभी अनुभवाचा, मग सवयीचा आणि शेवटी व्यसनाचा भाग होतो. मार देणाऱ्या माणसालाही कमी कष्ट होत नाहीत. सारखी संतापण्याची सवय लागते. तेव्हा मार खाऊन वठणीवर येणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हळू हळू कमी होते. ह्यापेक्षा मनाला हात घाला. पोलिसी व्यवसाय दंडूक्यापेक्षा बुद्धीने करा. समोरच्या माणसाचं बलस्थान शोधण्यापेक्षा, तो दुर्बल कशाने होतो ते जाणून घ्या. प्रहार तिथे करा. त्याला मारझोड करण म्हणजे त्याच्या बलस्थानाशी झुंज देण्यासारखे आहे. मारलं की गुन्हा कबूल केला जातो, हा एकच नियम जर आयुष्यभर सांभाळलात, तर तुमच्याही बुद्धीची वाढ होणार नाही. फक्त झोडपून काढून प्रश्नांची उत्तर मिळवायची असतील तर चार पैलवान नेमून काम भागल असत. गुन्हेगाराला बेरड बनवू नका. त्याला हळुवार बनवा, म्हणजे तुमचीही दमछाक होणार नाही.
वपूर्झा / 105/Surendra /2212024(२)
" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "
000o000
नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरत चिरंजीव होत. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
" साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असत. त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही "
वपूर्झा / 108/Surendra /2212024
".भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे "
000o000
भाऊबंदकीच आपल्या महाराष्ट्रात बारमाह पीक येत. त्याशिवाय आणखी एक पीक आहे. ह्या पिकाला पाऊस नको. जमिनीची निगा राखायची कटकट नको. विहीर न खणताच " ती खणली " अस दाखवून सरकारी खर्च वसूल करण नको. ह्या पिकाला खडकाळ जमीन पण चालते. ह्या शेतात " कंड्या" पिकतात. सर्वात जवळचे नातेवाईक हे पीक काढतात. हे भाऊबंदकीच ठीक आहे. तो आपला राष्ट्रीय धर्म आहे. पण फुटीर बाणा हा तर आयुष्याचा कणा आहे.
वपूर्झा / 108/Surendra /21122024(२)
". सवय वैरीण, आणि तिला जन्म देणारे आपणच. "
000o000
गादी - उशीशिवाय झोपणं तर सोडाच, पण नेहमीची उशी जरी वाटनीला आली नाहीं तरी आपली मिजास जाते. दिवसातून दहा वेळा जप करतो. डोळ्याला डोळा नाहीं हो रात्रभर.
रात्र वैरीण नसते. उशी तर नसतेच नसते.
सवय वैरीण, आणि तिला जन्म देणारे आपणच.
वपूर्झा / 111/Surendra /21122024
" मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत. "
000o000
मित्रामित्रांच्या वां दोन स्त्रियांच्या दोस्तीबाबत बघणाऱ्यांच्या डोळ्यांचा नंबर कमीजास्त होत नाही. पण एक स्त्री आणि एक पुरुष म्हटल की रामायणातल्या लंकेतले नागरिक आणि महाभारतातील कौरव एकत्र येतात. पांडवांप्रमाणे क्रमाक्रमाने, जाणिवेने पौरुषत्वाने द्रौपदीची जबाबदारी न उचलता, निव्वळ घटकाभर करमणूक म्हणून द्रौपदीच्या निऱ्यांना हात घालणाऱ्या कौरवांनी समाज भरलेला आहे. म्हणूनच स्त्री- पुरुष मैत्री म्हटल रे म्हटल की ती सेक्स रिलेशन साठीच असते, अशा रबरी शिक्यासकट माणस ती गोष्ट गृहीत धरतात. शिक्का सतत ओला ठेवतात. म्हणूनच त्या मैत्रीची शान सांभाळणे हे अश्वमेधाचा वारू संभाळण्या इतकं जोखमीचे असत.
वपूर्झा / 112/Surendra /20122024
" प्रत्यक्ष पराभवांपेक्षा, तो कबूल करावा लागण हा पराभव मोठा असतो. "
000o000
प्रत्यक्ष पराभवांपेक्षा, तो कबूल करावा लागण हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तुत्व कमी पडत तर कधीकधी कर्तबगारी असून, भूमीच रथाच चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी, चाकं न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते.
प्रत्येकाचं असण हे जस त्याचं स्वतःच असण असत त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ओनरशीपच्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणका आतून फुंकर बाहेरून आत. समस्या ह्या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत जाते. जशी उमेद ओसरत असते, त्याचप्रमाणे फुंकर घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही, कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेलो असतो.
वपूर्झा / 112/Surendra /19122024
" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल? "
000o000
अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे, शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांनाची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण. पोस्टमार्टेम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजण, बससाठी डोळ्यात प्राण आणून, बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करण, नाहीतर नोटांमागून नोटा खर्च करायची तयारी ठेऊन टॅक्सीने प्रवास करण. ' मृतत्म्याला शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे ? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ह्या शहरात ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसाची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्मा शांत कसा राहिल?
वपूर्झा / 121/Surendra /17.122024
" यश म्हणजे तरी काय ?."
000o000
यश म्हणजे तरी काय ? यश म्हणजे प्रकाश. प्रकाश असतो तरी किंवा नसतो तरी, पण दोन्हीं अवस्थेत त्याच्या. प्रभावाच किंवा अभवाचं अस्तित्व मानावच लागत. तीच गोष्ट यशाची. त्यामुळे शिखरापाशी पोचलेला हा यशस्वी असतोच, पण त्याच वेळेला मिळालेल्या उंचीचा हिशोब साधण्यासाठी तितकेच लहान - मोठे खड्डेही ह्याच वाटचालीत निर्माण झालेले असतात, आणि उंचावरून ज्याचे त्याला हे खड्डे, ह्या दऱ्या जास्त ठळकपणे जाणवतात. ह्या वाटचालीतले काही खड्डे काही व्यक्तींना पटकन दिसतात. त्यातही बायको ही पहिली व्यक्ती. तिला नवऱ्याच्या यशाच्या शिखराअगोदर खड्डेच प्रथम दिसतात. ह्यात तिची चूक नाही. कारण ती त्यांचं दुसरं चाक. तिला त्या खड्यांचे शारीरिक, मानसिक,आर्थिक, लौकिक हादरे जास्त बसतात. ह्या हादऱ्याबरोबरच नवऱ्याकडे कुणी बोटं उगारता कामा नये, हा तिने स्वतःच घालून घेतलेला दंडक असतो. सवलत वा संशयाचा फायदा ती तिच्या कोर्टातल्या आरोपीला द्यायला तयार नसते. तिची ती भूमिका योग्य असते. कारण ज्योत जळून तेजोमय ठरते, संमई नुसतीच तापत राहते.
वपूर्झा / 138/Surendra /15122024
" संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग."
000o000
गुलामगिरीत आयुष्य काढायचं म्हणजे डझनाच्या हिशोबानेच मुलं हवीत अस नाही. पाळणा एकदा हलला तरी पुरतो. पाळणा मुळीच हलला नाही तरी तुरुंग चुकत नाही. नवरा असतोच.
तो बांधलेला असूनही मोकळा. बाई कायम बंदिवान. म्हणूनच, लग्न न करणाऱ्या बाईबद्दल कुचेस्टेने बोलल्याशिवाय त्यांना त्यांच्या पायातल्या बेड्या हलक्या वाटत नाहीत. संसार कसाही असला, नवरा कितीही विक्षिप्त असला तरी उभ्या आयुष्याचं सार्थक, कपाळावरच्या टिकलीच्या आकाराच होत.
संसाराचा तुरुंग हा महाभयानक तुरुंग. कारण या तुरुंगातले कैदी, इतर मोकळी माणस कैदी कधी होतील ह्याची वाट बघत असतात. तुरुंगाच्या कोठड्या जास्तीत जास्त शोभिवंत करतात. आपल्या किती पिढ्या ह्या अशाच तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगून नांदल्या ह्याच्या कहाण्या सांगतात. लग्न न करण हाच गुन्हा असतो हे कोठडी - कोठडीतील गुन्हेगार आपापल्या मुलांना सांगतात.
वपूर्झा / 139/Surendra /14122024
"होणाऱ्या किंवा नवविवाहित वधुवरांसाठी महत्वाची टीप"
000o000
अक्षता ह्या शब्दातल प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे.
अ : अर्पण भाव. क्ष : क्षमाशीलता. ता : तारतम्य.
हे तीन गुण दोघांजवळ हवेत.
प्रेमातील नवी नवलाई आता काहीशी कमी झाली असेल तर दोघांनी आपापल्या डोळ्यावरच्या पट्ट्या उतराव्यात.
एकमेकांच्या वृत्त्तींचा खरा मागोवा घ्यावा. सप्तकातले किती सुर जुळतात ते भाबडेपणा टाकून तपासाव. मुख्य म्हणजे एकमेकांसाठी आपण कोणत्या गोष्टींना मुरड घालू शकणार आहोत, त्याचा ह्याच कालावधीत शोध घ्यावा. संघर्षाच्या जागा हेरून ठेवाव्यात. मुरड घालण हा सहजधर्म व्हायला हवा . कात टाकली की साप तिकडे वळूनही बघत नाही, इतक्या सहजतेने आपण एकमेकांसाठी काय टाकू शकतो त्याचं संशोधनाचं करायला हवं. एकमेकांना टाकण्यापेक्षा, एकमेकांसाठी काही ना काही टाकंण ह्यालाच अर्पणभाव म्हणतात
स्वतःतल्या उणीवांची खरी जाणीव झाली आहे. दोष समजले आहेत कमकुवतपणाच्या जागा समजल्या आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न करूनही आपल्या जोडीदाराचे वृत्तिदोष जात नाहीत समजल्यावर तिकडे दुर्लक्ष करायची शक्ती म्हणजे क्षमाशीलता.
तरतमभाव न बाळगता घ्यायचं कस आणि लडिवाळ हट्ट करून वसूल कधी करायचं, वाकायचं कधी आणि वाकवायला,स्थळ,काळ,स्थिती ह्याच भान म्हणजे तारतम्य.
वपूर्झा / 142/Surendra /13122024
"संसार क्रिकेट सारखा असतो ."
000o000
" पारितोषिक, प्रशस्तिपत्रक, कप , पेले ,सुवर्णपदक," म्हणजे ' यश ' नव्हे . ती ' किर्ती ' . यशाचं नातं वर्तमानकाळातल्या प्रत्येक क्षणाशी, स्वाशाइतकं असत. प्रत्येक क्षणी श्वास घ्यावाच लागतो. यश तसच. आणि संसार क्रिकेट सारखा असतो. विकेट समोर उभ राहिल की प्रत्येक बॉलच काहीतरी करावं लागत. ' भूत, वर्तमान, भविष्य म्हंजे तीन स्टॅम्पस ' अस एक क्रिकेटीयर म्हणतो. बेल्स म्हणजे काळ. टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही. तो तुम्हाला अडवावा लागतो. सोडून देणे, थांबवणं, टोलवण यापैकी काहीतरी एक करावच लागत. तुम्ही जर बॉलर्स एंडला असाल तर साथीदाराबरोबर पळापळ करावी लागते. टेनिस, बॅडमिंटन किंवा आपल्या हुतुतूच्या खेळाप्रमाणे इथ पुनर्जन्म नाही. साथीदार आऊट होऊ नये, म्हणून जपायच असत. साथीदाराशीच स्पर्धा केलीत तर कदाचित आपल्याला
पॅव्हिलियन मध्ये बसावं लागेल, आणि आपला जोडीदार मग दुसऱ्याच खेळाडू बरोबर खेळताना पाहावं लागेल.
वपूर्झा / 146/Surendra /12122024
" पुरुष म्हणजे दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्म सांभाळणार जंक्शन. ."
000o000
नोकरी करता तेव्हा तुम्ही काय करता ! जातीने - गोतीने एक नसलेल्या वरिष्ठाला मनातून शिव्या देत, प्रत्यक्षात तुम्ही माना वाकवताच ना! त्याची प्रसंगी मुर्खासारखी बोलणी सहन करताच ना ! अपराध नसतांना शिक्षा सहन करताच ना ! मग तशीच थोडी पॉलिसी घरी का वापरू नये? दुसऱ्यासाठी नाही, स्वतः साठीच! द्या थोडा मोठेपणा घरातल्यांना! एवढं काय नुकसान होणार आहे त्याने? घरातल्या माणसांशी अस दुटप्पी वागण्याची वेळ येऊ नये हे मान्य, पण दुर्दैवाने माणस तशी भेटली तर काय इलाज? त्या मोठ्या माणसांचे स्वभाव तसे का बनत गेले त्यालाही काही कारण आहेत, इतिहास आहे. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांनीही झगडा दिला आहे, पराभव पचवले आहेत. हे सगळ कुणी पाहायचं? याचा विचार कुणी करायचा? मी एकट्याने? कारण मला बायकोही हवी आणि आईही हवी, हा माझा दोष! मी माझ्या आईचं सबंध जीवन जवळून पाहिलं आहे. तिच्या स्वभावाचं बारीक निरीक्षण केलं आहे. तिच्या स्वभावातल्या गुणांपेक्षाही तिच्यात ह्या वयात निर्माण झालेले दोष मला जास्त माहीत आहेत. त्या दोषांसकट तिला कोणीतरी सांभाळायला हवं आहे.
सगळ्यांचं व्यवस्थित होणार आहे. आईच्या मार्गाने आई जाणार आहे. पत्नी चाललीच आहे. लोंबकळतो काय तो मीच! एका गाडीने आपण प्रवासाला निघायचं. ठराविक स्टेशन पर्यंत आपला त्या गाडीने प्रवास व्हायचा. नंतर गाडी बदलायची आणि पुढच्या मुक्कामाला पोचायचं. दोन्ही गाड्या सारख्याच महत्वाच्या! पहिली गाडी वेळेवर पोचायला हवी. दुसरी प्रवास पुरा करण्याइतकी तेवढीच ताकदवान हवी. पण दोन्ही गाड्यांना प्रवासापेक्षा स्वतःच्या गतीच आणि दिशेच जास्त महत्त्व वाटत. अस ज्या ज्या घरात घडत, त्या त्या घरातला पुरुष स्वतःला प्रवाशी समजतो. पण तो असतो निव्वळ मधल जंक्शन. दोन्ही गाड्यांचे प्लॅटफॉर्म सांभाळणार जंक्शन.
वपूर्झा / 145/Surendra /10122024
" आपण आपला संसार चालवतो अस रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही ."
000o000
कुंवतीनुसर कलावंतांसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी समाजातील छोटी माणसं फार झटतात. खर तर छोटी माणसं, मोठी माणस अस काही असतच नाही. संपूर्ण रामरक्षा मोठी की की नुसत '. राम ' हे नाव मोठं? प्रपंच करणारा जीव व्यवहारावरच जगतो. निर्माण केलेल्या वस्तूने आणि नेमलेल्या माणसाने सांगितलेलं काम करायला हव. प्रत्येकजण म्हणून त्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातला सम्राट असतो. वाफेतली ताकद ओळखून इंजिनचा शोध लावणारा वॅट मोठा, हे कोण नाकारील? पण आपण ज्या गाडीने प्रवास करणार असतो त्या गाडीचा ड्रायव्हर वॅट पेक्षा मोठा असतो. योग्य वेळी योग्य ड्रायव्हर भेटल्या शिवाय संसाराचा गाडा चालत नाही. आपण आपला संसार चालवतो अस रुबाबात म्हणण्यात काही अर्थ नाही. अनेक ज्ञात - अज्ञात सारथ्यांच्या हातात आपल्या संसाराचे अनंत लगाम असतात. फक्त दुसऱ्या माणसांसाठी नियमांवर बोट ठेवणाऱ्या आडमुठ्या ड्रायव्हर्स पायी आपली साधी साधी काम कशी रखडतात, हे आठवून पाहावं, आणि अचानक एखादा असाच सारथी लाभल्यामुळे रेंगाळलेली कामे कशी हां हां म्हणता झाली आहेत, ह्याचही स्मरण ठेवाव.
वपूर्झा / 147/Surendra /09122024
" ' मी अडाणी माणूस आहे ' ."
000o000
आयुष्याच पुस्तक वाचायला निराळच इंद्रिय लागत. सरकारने मंजुरी दिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक खूपच निराळं. ह्या पुस्तकाची भाषा ही लिपी नसलेली भाषा आहे. म्हणूनच ह्या पुस्तकाचं वाचन करणाऱ्या माणसाला डिग्री नाही. आयुष्याच पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचा कसा? - कधी? तर तो माणूस अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा. ' मी अडाणी माणूस आहे ' ह्यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते. नम्रतेचा पोशाख घालून चातुर्य जेव्हा प्रकट व्हायला लागत, तेव्हा ह्या माणसाची युनिव्हर्सिटी शोधायची नसते. ही माणसच निराळी. चार बुक शिकलेल्या माणसांना आपली हुशारी, आपल ज्ञान, विद्वत्ता, रुखवतासारखी कधी मांडून ठेऊ अस होत आणि ही माणसं कशी असतात? पाकिटावर स्वतःच नाव न घालता आहेर करणाऱ्या आप्तांसारखी असतात.
-----------------------------------------------------------------------
वपूर्झा / 149/Surendra /08122024(2)
" हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे. ."
000o000
गरजेचं नातं घड्याळाच्या काट्यांशी असत. प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असत. कामाचं त्रैराशिक आठ तासांच्या पाढयांवर आखलेल असत, सेवेचं नातं म्हणजे संपूर्ण हयातीचा संकेत असतो. कामाची वेसण सक्तीच्या हातात असली की जास्तीत जास्त वेळ हुकूमशहाची उपस्थिती आवश्यक. ह्याउलट कामाचं नातं भक्तिशी जडल तर वरिष्ठांच्या निव्वळ आठवणींवर कारभार चांगला चालतो. शिस्तीच्या आणि शिक्षेच्या बडग्याशिवाय कामं होत नाहीत अशा विचारांवर भिस्त असलेले सगळे मालक गुलामांसारखे दिसतात. सेवकांपेक्षा जास्त दमतात. ह्याउलट विश्वास, प्रेम वात्सल्य ह्यांनी एकदा माणसं बांधून ठेवली की मालक मुक्त होतात. टवटवीत असतात. हाताखालच्या माणसांच्या शेपट्या हातात ठेऊन जी माणसं कारभार चालवतात, ती स्वतः दोन पायांची जनावर असतात. त्यांना सलाम होतात. ते रीत म्हणून. आदरापोटी नव्हे.
वपूर्झा / 149/Surendra /08122024
" संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो? ."
000o000
काही मोजकी घर वगळली तर विवाह सोहळ्या निमित्त दरवाजावर लावलेलं तोरण जीर्ण व्हायच्या आतच सगळ्या वास्तुला विसंवादाची वाळवी लागल्याचं चित्र सर्वत्र दिसतय. इतक्या झपाट्याने अनेक ठिकाणी हेच चित्र का दिसावं? एकीकडे वेगवेगळ्या आकारांच्या, रंगाच्या, माध्यमांच्या कलापूर्ण मंगल पत्रिका छापल्या जाताहेत. प्रत्येक मंगलपत्रिकेगणिक गणपतीबाप्पा नाविन्यपूर्ण फॉर्ममध्ये अवतार घेत आहेत. बुद्धीच्या ह्या देवतेला कलावंतांनी वेगवेगळे आकार दिले आणि त्या दैवतानेही चित्रकाराच्या कुंचल्या पेक्षा आपण जास्त लवचिक आहोत, हे सिद्ध केलं. प्रत्यक्ष विवाह सोहळ्यात तर पौरोहित्य करणाऱ्या गुरुजिंपेक्षा जास्त महत्व व्हिडिओ कॅमेरामनला प्राप्त झालं आहे. मंत्रसंसंकारांच्या पावित्र्याकडून किती झपाट्याने बुद्धिवान समजला जाणारा आपला समाज, यांत्रिक झगमगाटाकडे वळतोय, त्याच हे विदारक उदाहरण. खर तर सगळ्या मंगळकार्यावर ' थिएटर्स ' चे फलक लावावेत. ' श्रृती मंगल थिएटर ' , ' आनंद थिएटर ' अस म्हणावं. स्टुडिओतले कॅमेरे फक्त बटणच दाबायची अक्कल असलेल्या माणसांच्या हातात आले आणि संसारात रंग भरायच कौशल्य, अर्पण भाव ह्या गुणांशी फारकत घेऊन आम्ही फक्त सोहळे सुशोभित करायला लागलो. आम्ही इतके कुणाला विकले गेलो? का गेलो?
वपूर्झा / 153/Surendra /07122024(2).
" आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस सांभाळू शकतो. ."
000o000
" सौंदर्य हा प्रचंड मोठा सर्वस्पर्शी शब्द आहे * भरपूर मेहनत करून घामाचा वर्षाव करीत जाणारा हातगाडी वाला, दुपारच्या भाजणाऱ्या उन्हात सौंदर्याने चमकत असतो. कष्ट हे सौंदर्य. बुध्दी हे सौंदर्याचंच रूप. नम्रता म्हणजे देखणेपणा. कोणतही काम भक्तीने करण हेच सौंदर्य आणि प्राप्त झालेली कोणतीही शक्ती कुजवत ठेवण ही कुरूपता.
समोरच्या चालत्या - बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दुःखी होत नाही एवढं माणूस सांभाळू शकतो.
वपूर्झा / 155/Surendra /07122024
" शिक्षण म्हणजे काय? ."
000o000
शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरसच विसरलं गेलं तरी चालत. व्यवहारात मिळत ते शिक्षण वेगळ. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा - माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करण वेंगळ आणि गणित समजण वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताचं आकलन होण ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या. तेवढ्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून. दोन रुपयांचा नारळ, पाच रुपयांचे पेढे, आठ आण्यांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दहा पैसे एवढ्या साधनांवर माणूस देवळापर्यंत पोचतो. देवापर्यंत जातो का?
वपूर्झा / 163 /Surendra /06122024 (2,)
" स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो."
000o000
समाजापासून, वर्तुळापासून, नातेवाईक,मित्र, थोडक्यात म्हणजे, ' संवादा ' पासून जो तुमची फारकत करतो, ज्या वृत्तीमुळे तुम्ही एकटे पडता तो सगळा दुरभिमान. दुरभिमानात थोडी हिंसा डोकावते. इतरांची मन ही अशी सहजी मारता मारता, दूरभिमान स्वतःचीही हत्या करतो. स्वाभिमान गौरवास्पद असतो. तेवढाच फक्त जतन केला तर वर्तुळातली माणसही त्याची बूज राखतात. स्वाभिमानाची सोयरिक कर्तुत्वाशी असते. कर्तृत्वशून्य स्वाभिमानाला ' पोकळ ' विशेषणाचा भरगच्च आहेर मिळतो. स्वाभिमानी माणूस परावलंबी नसतो. नियतीच्या. लहरीपाई त्याला सत्तेपुढे नमत घ्यावं लागत. पण ती परिस्थिती तो फार सहन करू शकत नाही. स्वतंत्र, स्वायत्त होण्याच्या वाटा तो शोधत असतो. ' स्वतः ' ची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो.
वपूर्झा / 164 /Surendra /06122024
" भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. ".
000o000
पायथ्याशीच राहण्यामध्ये कल्याण आहे, ह्याचा शोध लागला की आयुष्यात धर्माचा उगम झाला अस समजावं. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल. पहाड वेगवेगळे असतील. त्याचप्रमाणे दगडही. आपण तेच तेच काम सातत्याने करत असतो. प्रत्येक वेळेला म्हणत राहतो की, माझ्या हातून काहीतरी चुकल असेल, पुढच्या वेळेला दुरुस्ती करू. पुन्हा यश मिळालं नाही की, माणूस केव्हातरी थकतो. ह्यात सुख असेल किंवा त्यात सुख असेल, अस म्हणत आयुष्यभर सुखामागे पळत राहतो. शेवटी हातात वैफल्यच येत. असा अनुभव आला, म्हणजे तो चिरंतन सुखाच्या शोधामागे लागतो. विफलता हेच अध्यात्माच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल. म्हणूनच भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला अधार्मिक म्हणता येणार नाही. शाश्वत सुखाचीच ती चुकलेली वाट आहे.
वपूर्झा / 170 /Surendra /04122024(2)
".स्वतःच्याच सावलीवर जो भाळला , तो फसला. ".
000o00oo
' भौतिक सौख्य ' इतका मोठा शब्दही वापरायचं कारण नाही. अमुक एक काम करण्यात मोठा आनंद आहे किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी गप्पागोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही. प्रत्येकाच्या वृत्तीनुसार त्यांचं ' हरवण, सापडण, हुरहूर वाटण ' हे सगळ भावविश्व स्वतंत्र असत. या अनंत प्रवासात कितीतरी मित्र भेटतात. ' या माणसाशिवाय मी जगू शकणार नाही ' अस वाटायला लावणारी अनेक माणस, एक ठराविक कालखंड सुगंधित करून जातात. आयुष्याला गती देतात. ' जगावं, अस काहीतरी एक आहे ' अस वाटायला लावतात. काही काही जणांना एका ठराविक हॉटेलमधल जेवण आवडत. नंतर नंतर अतिपरिचयाने म्हणा किंवा आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, म्हणून समजू या, आपण त्याच ठिकाणी फार काळ रमत नाही. तेच माणसांच्या सहवासाच्या बाबतीत घडत. स्वतःच्याच सावलीवर जो भाळला , तो फसला.
वपूर्झा / 172 /Surendra /04122024
" माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.' "
000o000
सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा अंतरमनातल्या विणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द ' जास्त '. दयाट्स ऑल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मोठ घर, जास्त वरच पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त! त्यासाठी राजकारण, युती करायची ती देशासाठी नाही, तर जास्त खुर्च्या हव्यात म्हणून. ' पंजाब, सिंध, गुजराथ' असं देशाचं विस्तीर्ण वर्णन करायच. पण ह्यांचा भारताचा खरा मनातला आकार दोन फूट बाय दोन फूट खुर्ची इतकाच आहे.'
तुला भारताचा पंतप्रधान केल तर तू काय करशील? सेक्युलर राष्ट्र हेच ध्येय पुढे चालवशील का? ' माझ्या सगळ्या राष्ट्राचा धर्म ' आनंद ' असेल आणि ध्येय असेल - महोत्सव, 'सेलिब्रेशन '! माझ्या राष्ट्राचा झेंडा असेल आकाशासारखा निळा. जमिनी बळकवता येतात, आकाशाचा लिलाव मांडता येत नाही, स्वतःच्या ' फार्म ' चे फलक ठोकता येत नाहीत. माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'
वपूर्झा / 172 /Surendra /03122024(2)
" माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.' "
000o000
सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा अंतरमनातल्या विणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द ' जास्त '. दयाट्स ऑल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मोठ घर, जास्त वरच पद, प्रेम आणि जास्त सेक्सही! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त! त्यासाठी राजकारण, युती करायची ती देशासाठी नाही, तर जास्त खुर्च्या हव्यात म्हणून. ' पंजाब, सिंध, गुजराथ' असं देशाचं विस्तीर्ण वर्णन करायच. पण ह्यांचा भारताचा खरा मनातला आकार दोन फूट बाय दोन फूट खुर्ची इतकाच आहे.'
तुला भारताचा पंतप्रधान केल तर तू काय करशील? सेक्युलर राष्ट्र हेच ध्येय पुढे चालवशील का? ' माझ्या सगळ्या राष्ट्राचा धर्म ' आनंद ' असेल आणि ध्येय असेल - महोत्सव, 'सेलिब्रेशन '! माझ्या राष्ट्राचा झेंडा असेल आकाशासारखा निळा. जमिनी बळकवता येतात, आकाशाचा लिलाव मांडता येत नाही, स्वतःच्या ' फार्म ' चे फलक ठोकता येत नाहीत. माझ्या निळसर झेंड्यावर सरस्वतीच्या हातातली वीणा असेल. राष्ट्र ज्ञानी हवं तसच ते संगीतमय हवं.'
वपूर्झा / 172 /Surendra /03122024(2)
" आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! "
Ooo0oo0
खोटं बोलण हे एकदा रक्तात मुरलं, हाड -मांस -मज्या - रक्तवाहिन्यांप्रमाणे " ॲनाटॉमी "चाच एक भाग झालं कीं, तो खोटेपणा ज्याचा त्यालाही कळत नाही. झोपेत आणि जागेपणीचे एकूण एक व्यवहार करतांना आपण श्वास घेत आहोत, ह्याचा आपल्याला पत्ता तरी लागतो का? आपल्या एखाद्या खोट्या समर्थनाचा आपल्याला बोधही होत नाही, इतके आपण असत्याशी एकजीव होतो.
' माझ्या जिवाची सगळी लावतोड तुमच्यासाठी होत आहे, ह्याचा तुम्हाला पत्ता तरी आहे का? हे सगळं चाललंय ते कुणासाठी?' असा प्रश्न घरोघरी बायका आपल्या नवऱ्यांना विचारतात.
त्याप्रमाणे, ' दिवसभर नोकरीं करतोय, त्याशिवाय ब्रोकरच काम करतोय किंवा पार्टटाइम जॉब करतोय, क्लासेस चालवतोय. ही सगळी धडपड कुणासाठी करतोय? रक्ताचं पाणी करतोय ' असली विधाने नवरेही करतात.
हा सगळा बकवास आहे. रक्ताचं खरोखरचं पाण्यात रूपांतर झालं, तर ते रक्तदानच. प्रत्येकजण जाता -येता RBC /WHC /टोटल काऊंटच्या तपासण्या करून घेईन. बायकोसाठी जीव गहाण ठेवणाऱ्या नवऱ्यापासून, त्याच्या बायकोने घटस्फोटहे. मागितला तर?
' आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवति! ' हे नारदानच वचनच खरं. नवऱ्याच्या आवडीचा पदार्थ त्याला करून वाढण्यात जोपर्यंत पत्नीला आनंद आहे, तोपर्यंतच ती तो पदार्थ करते. एकूण एक नात्याच्या, मित्रांच्या बाबतीत हे एकमेव सत्य आहे.
वपूर्झा / 173 /Surendra /03122024