"एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत."
000o000
" ज्यांचा परिचय झाल्यावर आपल्याला आपलं जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं ती सगळी चैतन्यन्याची रूप. ज्यांची नावं ऐकल्या - आठवल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं. ते सगळे अवतारी पुरुष. अवतारी पुरुष म्हटलं की रुद्राक्षांच्या माळा दिसायला हव्यात असं नाही. उलट असा काही व्यक्तीकडे मी आजवर, माहिती समजता क्षणी, श्रद्धेने गेलो आहे. तेव्हा वेदांत ऐवण्यापलीकडे, चिरंतन तत्व ऐकवण्यापल्याड त्यांनी काहीही केल नाही. ' प्रयत्न चालू ठेवा किंवा मार्गशिर्ष महिना जाऊ दे, ग्रीषम उलटू दे, मग बघा ' ह्यापलीकडे काही सांगितले नाही. मला अशा सगळ्या साधकांच्या वैयक्तिक साधने बद्दल काहीही शंका घ्यायची नाही. त्यांनी अप्रत्यक्ष दिलेल्या आशिर्वादावर सुद्धा काही संकटानंच परस्पर निर्दलान झालं असेल, पण व्यवहारात येणारी संकट आणि समस्या निवारण्या साठी जे वेगळं रसायन लागत, त्याला 'मित्र' म्हणतात. ऐन वैशाखात, ' वर्षा ' ऋतुची शास्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशोब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत, नेमकेपणा देतो, तो मित्र.
स्वतःचा वेळ खर्च करणारा, तुमचा मित्र देवमाणसासारखा असतो. फार कशाला, तुमच्या विद्ध मन:स्थितीत, भीषण एकटेपणी, एकाकी अस्थिर अवस्थेत, एकांतात एखाद्या व्यक्तीचा निशब्द वावरही तुम्हाला किती बळ देतो, ते जीवनाचा साथीदार गेल्यावर कळत.
वपुर्झा /Surendra /31012025