बुधवार, २२ जानेवारी, २०२५

" उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ?

"उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ?" 

                           000o000

           "   अशी कल्पना करा, सकाळी आरामात सात वाजता उठायचं. चहा, दाढी, आंघोळ आठ वाजेपर्यंत. नंतर पंधरा मिनिट चक्क टिवल्याबावल्या. साडेनऊ वाजता साधारणपणे तुम्ही घर सोडत असाल तर सकाळी सव्वा तास वेळ उरतो. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत घर. सात वाजेपर्यंत टिवल्याबावल्या. रात्री साडेनऊलां जेवण असेल तर दोन तास मिळतात. नऊ ते साडेनऊ जेवण. पुन्हा दहा वाजेपर्यंत अर्धा तास उरतो. दहा वाजता जनगणमन. रोज

पावणेचार तास मिळतात. त्या वेळेचा आपण काय उपयोग करतो? कुणाला तीन तास रिकामे मिळतील, कुणाला दोन,कुणाला अडीच. पण त्याच आपण काय करतो ? पावणेचार तासांप्रमाणे वर्षात सत्तावन्नं दिवस होतात. एका वर्षात आपण दोन महिने वाया घालवतो. मग उभ्या आयुष्यात असं वेस्टेज किती होईल ? कॉलेजचा कोर्स होईल. म्हणूनच ' वेळ मिळत नाहीं ' म्हणणाऱ्या माणसांवर विश्वास नाही"

वपूर्झा / 242/Surendra /23012025


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा