" सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात, पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स"
000o000
A). " सुचण ही प्रोसेस फार सोपी असते . स्वतःच्या आयुष्यात आपल्याला कोणती सुखं हवीत, कोणते आनंद हवेत ह्याचा शोध घ्यायचा. नेमक तसच सगळ समोरच्याला हवं असत. आपण जितक्या उच्च पातळीवरच्या अपेक्षा करू, देहातील भावनांचा विचार करू, तेव्हढ जास्त इतरांसाठी करू शकू. दुसऱ्याच मन ओळखण सोप. स्वतःचा विचार करतांना क्षणभर दुसऱ्याच मन दत्तक घ्यायचं,की झालं! " हेही कस सुचत? " प्रत्यक्ष कृती केली म्हणजे. प्रत्यक्ष कृती घडली ह्याची कारण आपण शोधू लागतो. कधी स्वतःच्या समाधानासाठी. इतरांना सुचत नाहीं, अस नाही. ज्यांना नुसतच सुचत ते फक्त आयुष्यभर ' मला हेच म्हणायचं होत ' अस म्हणत राहतात. सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात, पण कृती करत नाहीत ते सगळे फिलॉसॉफर्स . आणि जे कृती करतात ते संत."
B) " माणूस अपयशाला भीत नाही, अपयशाचं खापर फोडायला काही सापडलं नाही तर ? ह्याची त्याला भीती वाटते."
वपूर्झा / 254/Surendra /14012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा