शनिवार, १८ जानेवारी, २०२५

"स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो."

"स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो." 

                           000o000

           " काही माणस तापट असतात, काही आढयतेखोर, काही धुमी तर काही गर्व करणारी, काही ऑर्थोडॉक्स तर इतर न्यूनगंडवाली, धूर्त, लबाड, लफंगी, खोटारडी, नम्र, भिऊन राहणारी, ऐदी, आळशी , सतत उसन्या पैशांवर आयुष्य रेटणारी. प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरतर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो. पाठोपाठ संघटना, युनियन . नाव संघटना पण विघटन त्याचं कार्य. एकटा माणूस धार्मिक असू शकतो, पण त्याला अनुयायी म्हणजे गर्दी लाभली की तो तयार होणारा समाज धार्मिक असूच शकत नाही. तो हिंसेकडेच वळतो." 

वपूर्झा / 171/Surendra /18012025(2).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा