" राजाची कर्तव्य काय असतात ? ".
" राज्यकारभार करतांना त्याने काय दक्षता घ्यावी, प्रजेशी कसं वागावं, शत्रूशी कसं वागावं याविषयी उदबोधक माहिती .
प्रजापालान हेच राजाचं मुख्य कर्तव्य. प्रजापालन करायचं म्हणजे नेमक काय करायचं? तर कुलीनांचा चरितार्थ चालवायचा, दृष्टांना दंडित करुन सज्जनांच रक्षण करायचं, आपत्काली प्रजेला धनधान्य देऊन मदत करायची, नवनव्या सुखसोई तिच्यासाठी निर्माण करायच्या, परचक्रापासून तिच संरक्षण करायचं. एकूण llकाय तर प्रजेची ऐहिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रगती साधंण म्हणजे प्रजापालन. तपस्येहूनही त्याचं पुण्य मोठं असल्याचं नीतिकार सांगतात.
राज्याच्या विविध अंगांनवर लक्ष ठेवणे, नियम तयार करणे, प्रजेकडून त्याचं पालन करवून घेणं. डोळ्यात तेल घालून राज्याच्या सीमांच संरक्षण करण, कोषाची अभिवृद्धी करण. बसल्या जागी राज्यातील प्रत्येक घडामोड -- मग ती लहानशी का असेना -- त्याला कळली पाहिजे. त्यासाठी अर्थातच हाताशी कार्यक्षम हेरखाते हवं. त्याचे स्वतःचे विश्वासपात्र त्याने नेमावेत. त्यांच्या करवी अमात्य, मंत्री, सेनापती, अधिकारी, आपले मित्र, इतकंच नव्हें, स्वतच्या पुत्रावरही पाळत ठेवावी. या हेरांची एकमेकाशी ओळख होणार नाही याची काळजी घ्यावी. पाणवठे, नदीचे घाट, चौक, बसण्यासाठी बांधलेले पार, मंदिरे, यात्रा, उत्सव - जिथं जिथं माणस जमतात, गर्दी होते -- तिथे तिथं हेरांचा वावर असावा. हेर म्हणजे राजाचे चक्षूच.
दुर्योधन/141/Surendra /25012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा