शनिवार, २५ जानेवारी, २०२५

" प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"

 "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता?"                           

           "  प्रजेसाठी चांगला राजा कोणता? धर्मात्मा, सत्यवक्ता, शांत, चारित्रवान, जितेंद्रीय, आणि सौम्य शिक्षा करणारा राजा प्रजेला सुखावह होतो. राजाने बलाच्या उपासनेला योग्य ते महत्व दिलंच पाहिजे. कारण धर्मसुद्धा बलवंतांच्या अधीन असतो. जय केवळ धर्मामुळे मिळत नाही. त्याला शक्तीची, सामर्थ्यांची जोड हवी. वृक्षांच्या आश्रयाने वाढणाऱ्या वेलींची सत्ता जशी त्या वृक्षावर नसते, तशीच सामर्थ्यावर घर्माची सत्ता चालत नाही. दुबळ्यांच्या धर्माला कोण विचारतो? 

               राजाने कोणावरही विश्वास ठेवू नये. ज्याचा आपल्यावर विश्वास नाही त्याच्यावर तर नाहीच नाही, पण ज्याचा आपल्यावर विश्वास आहे, त्याच्यावरही नाही. राज्याची वाणी नम्र, पण अंतःकरण शस्त्राहूनही तीक्ष्ण असावं. शत्रूवर प्रहार करण्यापूर्वी गोड बोलाव, प्रहार करतानाही गोडच बोलाव आणि प्रहार केल्यावर त्याच्या विषयी सहानभूती व्यक्त करावी, खेद प्रदर्शित करावा. शत्रूने कितीही गयावया केली तरी त्याची गय करू नये. कारण ऋण,अग्नी आणि शत्रू यांना शिल्लक राहू दिल की, ते पुन्हा पुन्हा वृद्धिंगत होतात. वणव्याने होणारी वाताहत टाळायची असेल तर ठिणगीची उपेक्षा करताच कामा नये. शत्रूला आमिष दाखवावीत, आश्वासन, वचन द्यावीत, पण ती कधीही पाळू नयेत. त्यासाठी योग्य सबबी सांगतं जाव्यात. आपल्या कठीण काळात शत्रूशी सख्य करून आपलं सामर्थ वाढवावं. त्यासाठी कोणताही सुष्ट - दुष्ट मार्ग वापरावा. शक्ती वाढली की मग शत्रूशी धर्माच्या चर्चा करायला, प्रसंगी त्याला डोक्यावर घेऊन नाचायलाही हरकत नाही. मात्र योग्य वेळ येताच दगडावर आपटलेल्या मडक्याप्रमाणे त्याचा चुराडा करावा. राजकारणात            गोपनीयता हवीच. राज्यकारभाराचा प्राण आहे. पदरी माणसं निष्ठावान असावीत. त्यांची निष्ठा पुन्हा पुन्हा पारखून घावी. विषप्रयोगाने वा शत्राने एकटा - दुकटा  माणूस मरतो, पण गोपनीयता फुटली तर राजा, प्रजा यासह अवघ राष्ट्र धुळीला मिळत.

दुर्योधन/140/Surendra /26012025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा