सोमवार, २७ जानेवारी, २०२५

" परकीय शत्रूशी कसं वागावं?"

" परकीय शत्रूशी कसं वागावं?" 

                           000o000

           "  परकीय शत्रू हा तर राजनीतितला फार महत्वाचा विषय, त्याच्याशी कसं वागावं? परराष्ट्रनींतीत संधी आणि स्वार्थ महत्वाचा. इथे कधीच कोणाशी कायमच शतृत्व वा मैत्री करायची नसते. परराष्ट्रनीती आणि युद्धनीती हाताळतांना राजाने संधी, विग्रह, आसन द्वेधीभावं आणि समाश्रय याचा विचार केला पाहिजे. शत्रू आपल्याहून बलिष्ठ असेल तर संधी साठी जास्त प्रयत्न करावेत, शांतीचे गोडवे गावेत, स्वतःच फार नुकसान होणार नाही याची काळजी घेत शत्रूचं तुष्टीकरणहीं कराव. पण तेच जर आपलं सामर्थ अधिक असेल तर शांती धुडकावून विग्रहाची तयारी करावी. तो नसला तरी मुद्दाम निर्माण करावा, कुरापती काढाव्यात, शत्रूच्या मर्मस्थळावर छुपे आघात करावेत, त्याच्या राज्यातल्या घरभेद्दयांना हाताशी धरून शत्रूराज्यात उत्पात माजवावा. असे प्रयत्न करावेत की जेणेकरून शत्रू संघर्षासाठी सिद्ध होईल. कलहाच्या आढीत शत्रूच फळ आधी पक्व करावं, आणि मगच ते तोडण्यासाठी हात घालावा. कलह किंवा विग्रह हा छूप्या युद्धाचा प्रकार आहे. प्रत्यक्ष युद्धाआधी हे छद्म युद्ध राजाने अवश्य लढावं. त्यातून शत्रूला अडचणीत आणून ' यान ' म्हणजे चढाई करावी. चढाईपूर्वी शत्रूची सर्व बलंस्थान माहित करून घ्यावीत. शक्तियुक्तीचा योग्य समन्वयं साधून शत्रूला रणांगणात खेचाव आणि नष्ट करावं."दुर्योधन/144/Surendra /27012025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा