" संसार ही सर्वात अवघड कला आहे "
000o000
" संसारात आनंदी वातावरण जो ठेऊ शकतो, त्याला मी आत्मवान समजतो. मनात शांती असेल वा नसेल, पण वातावरण आनंदी ठेवण आपल्या हातात आहे. ह्यासाठी दिनरात कोशिश करणारा अंतर्यामी शांत आहे, अस कधीच होणार नाही. संसार ही सर्वात अवघड कला आहे.
प्रत्येक क्षण हा शिक्षणक्रमाचा आहे आणि आणि या क्रमातून जात असतानाच परीक्षा द्यावी लागते. वर्षभर अभ्यास नंतर परीक्षा असा सरकारी कोर्स नाही. अभ्यासक्रमाची टेक्स्टबुक आणि न फुटणारी प्रश्नपत्रिका एकाच वेळी हातात पडतात. बायको, वेगवेगळ्या वयाचा मुलगा आणि मुलगी, इतर नातेवाईक आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक हे सगळे परीक्षक आणि ह्यातलेच काही पेपरसेटर.
वपूर्झा / 168/Surendra /21012025
"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा