" क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद "
000o000
क्रिएटिव्हिटीचा क्षण एवढाच आनंद. क्षणाइतकाच छोटा. कवी, लेखक, नाटककार ह्यांना ज्या क्षणी सुचते, तेव्हा त्यांच्या आयुष्यातला तो तेवढाच क्षण ते जगतात. नंतर ती कल्पना कागदावर उतरवण ही कारकुनी. कंटाळवाणी प्रोसेस. अक्षर ओळख झाल्यापासून लिही - लिही लिहायचं. मग पुढचे क्षण चिंतेचेच. ते छापायला पाठवण... वेळेवर मिळेल का? नीट छापतील का? प्रसिद्ध होईल का? लोकांना आवडेल का? कौतुक करतील का? -- हया सर्व प्रश्नचिन्हात निर्मितीच्या आनंदाचा क्षण कुठं बरबाद झाला, कळत पण नाही.
वपूर्झा / 070/Surendra /05012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा