" मानसोपचार तज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत "
000o000
" एखाद्या व्यक्तीच्या प्रपंचात जेव्हा काही व्यथा निर्माण होतात तेव्हा त्याला इतर व्यक्तींपेक्षा परिस्थिती जबाबदार असते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात जाणवते. काहींना जणू भूकंपाचे धक्के बसतात, तर काहींना केवळ वेधशाळेने नोंद केली तरच समजतं. जी व्यक्ती मनाने जास्तीत जास्त संवेदनक्षम असते तिलाच तातडीने त्या वातावरणावर उपाय हवा असतो. हा उपाय कधी प्रत्यक्ष स्वरूपात हवा असतो तर कधी निव्वळ शब्दांची फुंकर पुरते. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक
तांणतणावाची तितक्याच लहरीवर दुसऱ्या कुणालातरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही तेव्हढीच बेचैन आहे, एवढाही आधार काहींना पुरेसा असतो. अशा आधाराची आवश्यकता निर्माण होणे आणि चार भिंतींच्या घरकुलात तसा हात न मिळण इथच कुठतरी वाळवी लागली आहे, ह्याची साक्ष आहे. एखादी व्यथा अशी असते. वाळवीचा बंदोबस्त एकवेळ करता येतो पण बांधकामात ' ओल ' कुठं वा का आहे हे भल्या भल्या तंत्रज्ञांना कळत नाही. तशी एखादी व्यथा - रुखरुखीची पाळमुळ किती खोलवर गेलेली आहेत, ते उकलत नाही. मानसोपचार तज्ञ त्याचं अस्तित्व मान्य करतात, पण त्याचं उच्चाटन करू शकत नाहीत."
वपूर्झा/239/Surendra /23012025(2)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा