" एक विचार नष्ट करायचा, म्हणजे विचारवंतच मारावा लागतो"
000o000
" एक विचार नष्ट करायचा, म्हणजे विचारवंतच मारावा लागतो. माणूस किती क्रूर, हिंस्त्र आहे, ते अशी कुणाची हत्या झाली की कळत, कालांतराने त्याचे पुतळे उभे करणाराही समाजच असतो. पुतळे उभे राहतात आणि पिंडाला न शिवणारे कावळे, त्या पुतळ्यावर बसून त्याची विटंबना करतात आणि ढोंगी राज्यकर्त्यांना वर्षातून एकदा पुतळ्यांना हार घालण्यासाठी निमित्त मिळत. समाजकंटकांना पुतळ्याची विटंबना करण्याची संधी मिळते. निधर्मी राज्यात जातीय दंगे होतात. ज्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत, त्यांनी हिंसा करू नका, हेचं सांगितले असताना, ' हमारा नेता अमर रहे ' अस पुतळ्यांकडे पाहत म्हणायचं आणि 'एके - 47' पासून 'चौपर ' पर्यंत सगळी हत्यारवा परायची. सत्ताधाऱ्यांनी अश्रुधुरांची नळकांडी फोडून जनतेच्या डोळ्यात धूळफेकीची नळकांडी सोडायची. "
वपूर्झा / 175/Surendra /17012025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा