शनिवार, ४ जानेवारी, २०२५

" शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून ! "

" शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून !  "

                           000o000

                ' आपण सगळे किती तेच तेच जगतो ', अस तुम्हाला कधी वाटल नाही?. झोपणं - उठण, तोंड धुण, काहीतरी पिण, दाढी , आंघोळ, प्रातर्विधी, नोकरी.... ह्यात नवीन काय?- शरीराने जगायचं आणि शरीराच्या सेवेसाठीच जगायचं, शरीराला जपायच. मन बोंबलत राहिलं तरी ते मारत राहायचं. एवढंस कुठं कुसळ डोळ्यात गेलं तर डॉक्टर कडे पळायचं. मनात नाना गोष्टी सलतात. तो सल कुणी काढायचा? आपण फार बोअर झालो आहोत. पैसा मिळवणं, साठवण, उडवण - सगळ तेच! कुठेच थ्रिल नाही. अशा वेळेने बांधलेल्या आयुष्यात माणस शंभरी सुध्दा गाठतात. लगेच सत्कार. का? खूप वर्ष मेला नाहीं म्हणून ह्याचा सत्कार. कसा जगला? तर बंधनं पाळत. बंधनं पाळत जगणं म्हणजे सातत्याने प्रत्येक क्षणी मरणचं. शंभरीला सत्कार करायचा, तो वारंवार मरण्याचा कंटाळा आला नाही म्हणून !             

वपूर्झा / 070/Surendra /04012025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा