बुधवार, ७ मे, २०२५

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? "

" एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? " 

                           000o000

                "   शिक्षण म्हणजे काय? पाठांतर करून लक्षात ठेवलेली जुजबी माहिती. ज्याचं पाठांतर जास्त तो हुशार. ज्याचं कमी तो मागे पडणारा. म्हणूनच शिक्षण संपत तेव्हा बरंचसं विसरल गेल तरी चालतं. व्यवहारात मिळतं ते शिक्षण वेगळं. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसा-माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढे पाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशात्र वेगळं, तर आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजण आणि संगीताच आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. ह्या सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या तेव्हड्यातच वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणार एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून वीस रुपयांचा नारळ, पन्नास रुपयांचे पेढे, वीस रुपयांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला दोन रुपये, एवढ्या साधनांवर माणूस देवळा पर्यंत होचतो. देवापर्यंत जातो का? 

वपुर्झा /163/Surendra /08052025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा