" प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म."
000o000
" काही माणसं तापट असतात, काही आढयतेखोर, काही घुमी तर काही गर्व करणारी, काही ऑर्थोडॉक्स तर इतर न्यूनगंडवाली, धूर्त, लबाड, लफंगी, खोटारडी, नम्र, भिऊन राहणारी, ऐदी, आळशी, सतत उसन्या पैशावर आयुष्य रेटणारी. प्रत्येक माणसाबरोबर एक नवा धर्म जन्माला येतो. खरं तर तो स्वभावधर्म. स्वभावधर्माला परिवार लाभला म्हणजेच त्याचा धर्म होतो. पाठोपाठ संघटना, युनियन. नावं संघटना पण विघटन हे त्यांचं कार्य. एकटा माणूस धार्मिक असू शकतो, पण त्याला अनुयायी म्हणजे गर्दी लाभली की तो तयार होणारा समाज धार्मिक असूच शकत नाही. "
वपुर्झा /171/Surendra /26052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा