" समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. "
000o000
" पंचवीस वर्षांपूर्वीच्या चुका मान्य करतांना आपल्याला काही वाटतं नाही काळ फक्त सगळ्या दुःखावरच इलाज नसतो तर चुकांवरही असतो. काल जर आपण एखाद्याचा अपमान केला, तर आज दिलगिरी दर्शवण जड जातं. काही माणसांजवळ लगेच चुका मान्य करण्याचा मोकळेपणा असतोही. तरी ती गप्प राहतात. का? एकच कारण. मोकळी होणारी मनं खूप अडतील. मोठ्या मनाची माणसं भेटतील न भेटतील. ह्या शंकने ती गप्प राहिली असतील, स्वतःचं मनं कुरतडत असतील. समाजात वाण आहे ती मोठ्या मनाची. मोकळ्या मनाची नव्हे. "
वपुर्झा /160/Surendra /04052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा