" एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "
000o000
" काही माणसांना चौकटीतल आयुष्य पेलत नाही. सुरक्षित वातावरणात ती कावरीबावरी होतात त्यांना हुरहूर हवी असते. सुखद बेचैनी हवी असते. चार वळून बघणाऱ्या माना हव्या असतात. कौतुकाने, आश्चर्याने बघणाऱ्यांच्या नजरेत ह्या अशा माणसांना, त्यांना अभिप्रेत असलेल्या स्वास्थ्याचा शोध लागतो. ' ह्यांना काय कमी आहे?' असं जेव्हा इतरांना वाटतं तेव्हा ते वाटणं शिष्टसंमत समाजापेक्षा वेगळं नसतं. ज्यांच्याजवळ कोणतीही वेगळी क्वालिटी नसते, अशीच माणसं विचित्र वागतात. ह्या अशा माणसांना फार लवकर सगळ्याचा कंटाळा येतो. ह्यांना कायम कसली तरी उब हवी असते. एखादी अनावश्यक पण नवी वस्तू खरेदी करुनसुद्धा ही माणसं अशी उब मिळवतात. "
वपुर्झा /165/Surendra /17052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा