" ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? "
000o000
" ' हा काळा आणि हा पांढरा ' अशा दोन कप्यांत आयुष्याचे सगळे रंग भरता येत नाहीत. काळा आणि पांढरा ह्या रंगांच्या मिश्रणाने, जो ' ग्रे ' म्हणजे ' राखाडी ' रंग तयार होतो, त्याप्रमाणे कौटुंबिक जीवनातले अनेक क्षण राखाडी रंगाचे असतात. म्हणून आपला सतत अर्जुन होतो. नातवंडांची बाजू घेऊन मुलाला किंवा मुलीला, त्यांचं चुकलंय, हे दिसत असूनही नातवंडांना न्याय देता येत नाही. आपला मुलगा हा त्यांच्या मुलांचा बाप आहे, त्याचा पिता म्हणून जे स्थान आहे, त्याला धक्का लागू नये म्हणून नातवंडानसमोर त्याला चार शब्द सुनवता येत नाहीत. आपण आजोबा असूनही, स्वतच्या मुलांसमोर मुलगा तुम्हाला उलट उत्तरं किंवा दुरुत्तर देऊ शकतो. त्या वेळेला आजोबांची ' आजोबा ' म्हणून जी प्रतिष्ठा आहे, ती काटेकोरपणे सांभाळण्याची गरज नसते. आई-वडिलांकडून जो न्याय मिळतं नाही, तो आजोबांकडून मिळवू, ह्या भावनेने नातवंड तुम्हाला बिलगतात. त्यांच्या विश्वास सार्थ होता, हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. मुलाच्या आधारावर जगायचं असतं. नातवंडांवर अन्याय होऊ द्यायचा नसतो. ह्यासारख्या प्रसंगांना ' राखाडी ' रंग म्हणायचा नाही तर काय म्हणायचं? "
वपुर्झा /168/Surendra / 18052025