" माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो."
000o000
" समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिथिती निर्माण होते आणि माणसाने तारतम्याने वागायचं असतं. त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादेपर्यंत विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो. म्हणून एव्हड्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. दुसऱ्याचे प्रश्न सोडवतांना तुम्ही त्याची बुद्धी वापरून, त्या समस्येंकडे कधीच बघू शकत नाही. तुम्ही तुमचाच तराजू वापरता. माणूस असाच आयुष्यभर एकटाच असतो. दोन मुलांपैकी एका मुलाला आमटी तिखट लागते आणि दुसऱ्याला सौम्य वाटते, हे चूक की बरोबर कुणी ठरवायचं? ".
वपुर्झा /180/Surendra / 01062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा