" ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते."
000o000
' संसार ही जबाबदारी असते. त्याचं ओझं वाटायला लागलं, की आनंद संपला. ' ' जबाबदारी आणि ओझं, ह्यातला नेमका फरक काय? ' " ओझं म्हणजे खांद्यावर दिलेला बोजा. पण कधी कधी दहा-बारा हजारांचा एखादा दागिना सांभाळायचा असतो. ते इतरांनाही माहीत नसतं. त्याला जबाबदारी म्हणतात. आयुष्यात प्रेम, मैत्री, संगोपन, शुश्रुषा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या. त्यांचं ओझं वाटली की सहजता गेली. " ओझं हीदेखील जबाबदारी नसते का? " " ओझं दिसतं कारण ते लादलेल असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते. ओझं बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं. "
वपुर्झा /117/Surendra / 23062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा