"ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा?"
000o000
" मान्य करा अथवा करू नका, माणसाला सतत काही ना काही थरारून टाकणार हवं असतं. ' माणूस ' कोणतीही व्याख्या, गणित, न्यायशात्र, मानसशांत्र आणि तर्कशात्र ह्या सगळ्यातून ' निसटण्याचं शात्र ' शिकल्याप्रमाणे पळणारा वा निसटणारा प्राणी. वर्तमानपत्रातील भयानक बातमी वाचून तो थरारतो. खून, आत्महत्या म्हटलं की हळळतो. महापुराच्या बातम्या पाहून तो परमेश्वराचा उद्धार करतो. अत्याचार, बलात्कार, लाचलुचपत, खुर्चीसाठी पागल झालेले पुढारी पाहून त्याची झोप उडते. तो शिव्यांची लाखोली वाहती. आणि हाच माणूस पेपर उघल्याबरोबर जर ह्या पैकी काही सापडलं नाही तर म्हणतो, " आज पेपरमध्ये काहीच नाही ". ह्यातला कोणता माणूस खरा? कोणता खोटा? "
वपुर्झा /113/Surendra / 22062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा