" गुरु आणि सद्गुरू ह्यात फरक आहे?
" जमीन - अस्मानाइतका. गावोगावी मठ बांधून राहतात ते गुरु. गुरु होणं हा सध्या धंदा झालाय. सद्गुरू एखादाच " ' मला फरक सांगाल? ''
'अवश्य '
" एक वर्ग आहे पंडित - पुरोहितांचा. चर्च, मशिदी, देवळ, गुरुद्वारा ही त्यांची स्थाने. भक्तांना गुन्हेगार आणि पपी ठरवल्या शिवाय ह्यांची आरत्यांची दुकानें चालत नाहीत. त्याच्या वरची पायरी " गुरु " म्हणविणाऱ्यांची. " माझ्यावर सगळं सोपवा आणि तुम्ही निर्धास्त व्हा " असा या लोकांचा नारा असतो. त्यामुळे समाज पांगळा होतो. समाजानेच निवडून दिलेले राज्यकर्ते समाजाइतकेच अस्थिर असतात. कडक पोलीस बंदोबस्तात तेही देवळाच्या वाऱ्या करतात. वर्तमानपत्रात फोटो येतात. समाजाला ह्या तऱ्हेने परंस्वाधीन केल्याशिवाय अशा लोकांचं गुरुपद टिकत नाही.
सद्गुरूंची बाब याउलट. सद्गुरूंकडे कुणी गेलं तर, आतापर्यंत त्या माणसाने काय काय पापं केली याच्याशी त्याला कर्तव्य नसत. जे हातून घडलं त्यात समोरच्या माणसाला बदल हवा आहे, हे जाणून तो त्याच्या भूतकाळात डोकावत नाही. आपल्या हातातला दिवा घेऊन सद्गुरू शरण आलेल्या माणसाबरोबर काही काळ वाटचाल करतो. नंतर स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण कर, असं सांगून त्याच्या हातात दिवा देऊन तो निघून जातो.
वपूर्झा / 176 /Surendra /01122024