"विचार शृंखला:124:20112025 "
124) " वर्तमानकाळ बोलायचा नसतोच. तो जगायचा असतो. माणसं बोलतात ती भूतकाळाबद्दल. त्यातल्या त्यात दुःखाच्या हकीगती. त्याचीच उजळणी. दुःख जितकं जुनं तितकं त्याला जास्त पॉलिश. जुनी दुःख जास्त आकर्षक करायची. ती अनेकदा सांगून सांगून निरूपणाला नेमकेपणा आलेला असतो. मोठ्या आघातांसाठी मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी सावरणणारेही अनेक भेटतात. छोटे छोटे आघात असंख्य असतात. ते एकट्याला गाठून हतप्रभ करतात. त्यात वाटेकरी नसतात. ते एकट्याने सोसायचे! माणूस थांबतो, शिणून जातो, खचतो. पण पुन्हा सावरतो. तो शिणवटा कुणाला कळत नाही. सावरणही समजत नाही! नव्या उमेदीने, मागे पहात पहात प्रवास चालू असतो, ठेवावा लागतो. "
वपूर्झा/सुरेंद्र/20112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा