" विचार शृंखला:112:04112025 "
112) प्रत्येक वेळेला रडणाऱ्याच सांत्वन करता येतच असं नाही. अर्थात रडणाऱ्याला त्याची जाणीव नसते. केव्हाही आपले डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी असं तिला वाटतं. पण काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्या माणसावरच जास्त ताण पडतो.ज्योतीपेक्षा समई जास्त तापत नाही का? दोन माणसांना जवळ आणू या, असं निव्वळ ठरवून ती एकमेकांच्या जवळ येतं नाहीत. ती मग सख्खी भावंड असली तरी! रंगाच्या पेटीत कितीतरी रंग एकत्र असतात. एकाच मातीतून बनलेले रंग. एकाच पेटीत राहणारे. पण त्यातले फार थोडे रंग दुसऱ्या रंगात चांगले एकरूप होतात. ह्याला कुणी ' का? ' म्हणून विचारलं, तर काय सांगायचं?
वपूर्झा/सुरेंद्र/04112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा