रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:118/119: 09112025 "

"विचार शृंखला:118/119: 09112025 "
 118) " जे अमूर्त आहे त्याला मूर्त करू नये. जे अमूर्त आहे ते निराकार आहे. जे निराकार असतं ते अनंत असतं. विश्व व्यापून उरतं. स्वप्न तशीच असतात. ती तशीच ठेवावीत. स्वप्नांचे रंग मोजता येतं नाहीत. स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत. छायाचित्रं सप्तरंगात कोंडता येतात. रंगांनी ओथंबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात? आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीचा रंग असतो, त्याच नाव अंतरंग. "
 119) " काही माणसांचा व्यवसायच असा असतो की त्याला काळवेळेचं शेड्युल नसतं. म्हणूनच अनियमित वेळापत्रकाच्या माणसाला सांभाळायचं असेल, तर कुटूंबातल्या इतर माणसांना काटेकोर दिनाचर्या हवी. " 
 120) " संशयी माणसं ' ट्यालेंटेड ' असतात असं मुळीच समजू नका. तसं असतं तर संसयी वृत्तीच्या एकूण एक माणसांना समजलं असतं की, आपल्या जोडीदाराला निव्वळ प्रेम करून आपल्याला जिंकता आलं असतं. संशयाच्या बेडीपेक्षा प्रेमाची बेडी तोडणं फार कठीण असतं."
वपूर्झा/सुरेंद्र/09112025
                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा