"विचार शृंखला:120/121: 11112025 "
120) " कर्तव्याची जाणीव तीव्रतेने जतन केली की, काम कोणतं करतं आहोत, हा विचार गौण ठरतो. फक्त कामच करायचं ठरवलं की मोजकी कामं केल्यावर इतर कामं आपण नाकारू शकतो. आवडीच्या कामाला प्राधान्य दिलं जातं. ते कामही पुरून उरण्याईतक असतं. आणि तरीही जी कामं राहतात किंवा आपण टाळतो त्यासाठीच हाकाटी सुरु होते. संसारासाठी राबूनही श्रेय हरवून बसावं लागतं. काम आणि कर्तव्य ह्यातला फरक नेमकेपणाने समजावा लागतो. "
121) " मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येतं नाही. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमाकाळ जपतो. मागच्या-पुढच्या क्षणाचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही. "
वपूर्झा/सुरेंद्र/11112025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा