मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:122/123: 19112025 "

"विचार शृंखला:122/123: 19112025 "

 122)  "  चोख कर्तव्य बजावणाऱ्या माणसांचा आनंदही स्वावलंबी असतो. नेमून दिलेल्या कामांना मी स्वीकारलेल्या कामांचे गणवेश चढवले. काम आणि कर्तव्य ह्यात मग फरक राहिला नाही. म्हणूनच ही व्यक्ती इतकी आनंदी कशी राहू शकते ह्याचं कोडं इतरांना उकललं नाही. अनेक कोडी उकलण्या पलीकडची असतात, कारण निव्वळ उभे शब्द आणि आडवे शब्द ह्यांच्या चौकटीत ती सजवता येत.  नाहीत. "

 123)  " प्रत्येक मूल त्याच्या आईवडिलांना स्वतःच्या रूपाने दुसरं बालपण जगण्याची संधी मिळवून देतं आणि काळाबरोबर पुढे जाऊन सुधारलेला समाज तुमच्या मुलांचं बालपण तुमच्या बालपणापेक्षा समृद्ध करतं. जनरेशन गॅपच्या नावाने हाकाटी करण्यापेक्षा, आपण आपलं बालपण नव्याने अनुभवावं, अशी वृत्ती असते, तेव्हाच आपल्याला लहानपणी न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात ह्यासाठी धडपडावंसं वाटतं. तुमचं सगळं बालपण दुःखाने भरलेलं होतं, ह्याला जो जेव्हा जन्मालाच आला नव्हता तो तुमचा मुलगा कसा जबाबदार होऊ शकतो? "

वपूर्झा/सुरेंद्र/19112025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा