शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला: 114/115: 07112025 "

" विचार शृंखला: 114/115: 07112025 "

 114)  "  नियंत्रणाचा मार्ग पोटाकडून मेंदूकडे जातो. महाराज, पोट गहाण पडलं की, मेंदू आपोआप गुलाम होतात. " 

 115)  " खुर्ची म्हणजे काय? खुर्ची म्हणजे कर्तव्य. खुर्ची म्हणजे वसा. प्रत्येक खुर्चीचा एकेक वसा असतो. तो खुर्चीबरोबर पतकरावा लागतो. माणसं त्यातली फक्त खुर्ची उचलतात, वसा विसरतात. खुर्ची मिळाली की उततात, माततात, घेतला वसा टाकून देतात. लोककल्याण जितक्या मार्गांनी करता येतं तेव्हड्या खुर्च्या निर्माण केल्या जातात. एखादा मार्ग नव्याने दृष्टिक्षेपात आला तर खुर्च्यांची संख्याही वाढवली जाते. माणसं लगेच त्या नव्या खुर्चीसाठी वर्णी लावतात, आणि वसा विसरतात. इथं खुर्ची काय करणार/ "

 116)  "  प्रकाश हा प्रकाशच असतो. त्याबद्दल दुमत नाही. संधीपर्काशाबाबत मतभेद संभवतात. पण आपल्या या लोकशाहीत प्रकशाला पण संधी शोधावी लागते. "

वपूर्झा/सुरेंद्र/07112025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा