शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

" विचार शृंखला:116/117: 08112025 "

"विचार शृंखला:116/117: 08112025 "

 116)  "  नाण्याचा खानखणीतपणा जाणायला वरचा अधिकारी जाणकार हवा. तो करप्ट असतो. त्याची खानखणीतपणाची व्याख्या वेगळी असते. तरीदेखील मनात येतं की, करप्ट ऑफिसरही परवडला. खालेल्या पैशांशी तरी तो ईमानी असतो. एखादा बिनडोक जेव्हा वरची जागा मिळवतो, तेव्हा तो हाताखालच्या माणसांनाच नालायक ठरवतो.    निगरगट्टानचं नुकसान परमेश्वरही करू शकत नाही म्हणतात, त्याप्रमाणे सगळं ऑफिस अशा दगडला शेंदूर फासून कुर्निंसात करतं. " 

 117)  " पोरकेपणा म्हणजे काय? आपली व्यथा इतरांना न समजण हाच पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. हे असंच असतं आयुष्यात, असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पडते आणि सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. ज्याच्यात जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस!पण कापरासारखं जळणं नको. ह्याचं कारण मागे काही उरतच नाही. राखेच्या रूपाने का होईना, मागे काहीतरी राहायला हवं. त्या राखेतून काहीतरी निर्माण होण्याची आशा असते. व्यथासुद्धा कापरासारखी जळता कामा नये. " 

वपूर्झा/सुरेंद्र/08112025

                                                            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा