" कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही."
000o000
" डिपेंडंट माणसं फार प्रेमळ आहेत असं आपल्याला वाटतं. प्रेम दाखवणे ही त्यांची व्यावहारिक गरज असते. मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंत त्यांचा तो आंतरिक उमाळा असतो. त्यांच्या वैयक्तिक गरजा कमी असतात. आपण आपल्या प्रेमाचा वर्षाव वस्तूंच्या रूपाने व्यक्त करतो. देणग्यांचा वर्षाव करतो. तिथं चुकतं." " आपल्या मुलाचं वस्तूंवरच प्रेम आपणच वाढवीत नेतो. त्यांच्या गरजांची वाढ करतो. मग चालत्याबोलत्या माणसांपेक्षा, वस्तूंना प्रायोरिटी मिळते. मुलं मोठी व्हायला लागली की त्यांची स्वतःची मतं तयार व्हायला लागतात. ती तुमचं मूल्यमापन करायला लागतात. देणग्यांचा वर्षाव करून करून तुम्ही त्यांना इनडायरेक्टली आत्मकेंद्रित बनवत जाता. कालांतराने मिळणाऱ्या वस्तूंचीही किंमत राहत नाही आणि त्या वस्तू देणाऱ्यांचीही.
वपुर्झा /125/Surendra /14032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा