" स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."
000o000
" प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरं जाण्याची एक कला असते. आयुष्य म्हणजे पुनरुक्ती. ब्रेकफास्ट, आंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटूनपालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणीक, त्याच पोळ्या. मग एखादी डुलकी. पुन्हा दुपारचा चहा. परत रात्रीच जेवण. मग झोप. हा झाला एक दिवस. प्रति क्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते. पण त्याला ते शिकवावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं असत. मग ते मनच तुम्हांला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकवत. ते मन मग लेखकाला कथानकं पुरवत, कवीला शब्द सुचवत, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध. साध्यासुध्या, सर्वसामान्य बाईचं आदर्श गृहिणीत रूपांतर कसं करायचं, हेही मनच शिकवत. स्त्रीची गृहिणी होण, हीसुद्धा कलाकृतीच आहे."
वपुर्झा /126/Surendra /15032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा