" समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात."
000o000
" प्रत्यक्ष पराभवापेक्षा, तो कबूल करावा लागणं हा पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडत तर कधीकधी कर्तबगारी असून, भूमीच रथाच चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या पराभवासाठी, चाकं न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. प्रत्येकाच असण हे जस त्याचं स्वतःचं असण असतं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या समस्या पण ownership च्या असतात. समस्या आणि जखमा पण. समोरचा माणूस फक्त फुंकर घालण्याचं काम करतो. ठणका आतून पण फुंकर बाहेरून आत. समस्या या वयाच्या कोणत्याही वळणावर पडतात. त्या सोडवण्याची आपली उमेद मात्र ओसरत जाते. जशी उमेद ओसरत असते, त्याचप्रमाणे फुंकर घालणारे सहप्रवासी पण कमी होत जातात. नवे प्रवासी जोडण्याची ताकद राहत नाही, कारण पूर्वीच्या प्रवाशांसाठी आपण खूप राबलेले असतो. "
वपुर्झा /112/Surendra /06032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा