" स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."
000o000
" प्रत्येक माणूस प्रेमळ असतो, आपली फक्त रीत बदलणं आवश्यक आहे. कशी?. चार भिंतीच्या आत फक्त प्रेमच असावं. चार भिंतींच्या बाहेर तर्काने प्रश्न सोडवावेत. आपण उलट करतो. ज्यांच्याबरोबर आयुष्य घालायचं त्यांच्याशी मोकळेपणाने न बोलता नुसते तर्क करीत बसतो. अनेक माणसांचे भयानक अनुभव घेऊन घेऊन कोणत्या माणसाला विश्वासात घ्यावं असा प्रश्न पडतो हे एक आणि दुसरं म्हणजे, उद्ध्वस्त माणूस जास्त स्वाभिमानी आणि कडवा होतो. पराभव मान्य करायची त्याची शक्ती संपलेली असते. दुसऱ्या माणसाशी युद्ध करायला फार बळ लागत नाही. स्वतःशीच सामना करण भयानक कठीण आणि स्वतःच्या माणसांजवळ पराभव मान्य करण त्याच्यापेक्षा कठीण."
वपुर्झा /118/Surendra /09032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा