" मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ? "
000o000
" अपघाती मरण म्हणजे त्या मृतात्म्याचे धिंडवडे. शरीराची विटंबना आणि नातेवाईक, आप्तेष्टांची ससेहोलपट. कॉरोनरकडे ताटकळण, पोस्टमार्टम विनाविलंब व्हावं म्हणून तिथंही हात ओला करण, फार कशाला, प्रेतावर टाकण्यासाठी पांढरा कपडा हवा असेल, तर तिथंही दक्षिणा मोजणं, बससाठी डोळ्यांत प्राण आणून बॉडी ताब्यात मिळेतो पळापळ करणं, नाहीतर नोटामागून नोटा खर्च करायची तयारी ठेवून टॅक्सीने प्रवास करण. ' मृतात्म्यास शांती मिळो ' अस फक्त म्हणायचं, पण त्यात काय अर्थ आहे? चार घटका माथा टेकायला जमीन हवी असेल तर लाखो रुपये ओतावे लागतात. जिवंतपणी सामान्य माणसांची जी परवड व्हायची ती होतेच. पण मरणही जिथे शांतपणे मिळत नाही तिथे मृतात्म्या शांत कसा राहील ?
वपुर्झा /121/Surendra /11032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा