" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. "
000o000
" पॅटर्न म्हणून स्वीकार करायचा. सगळ्याचाच. सत्ता गाजवण्यासाठी जे गळचेपी करतात, खून करतात, पोलिसयंत्रणा राबवतात. पद्मश्री, पद्मभूषणाच्या खिरापती वाटून विचारवंतांना गप्प बसवतात. फार कशाला, कोण्या एखाद्या महात्म्याने हा जन्म संपवून, पुनर्जन्मातल निम्मं आयुष्य संपवल्यावर त्याची गणना ' रत्नात ' करतात. हे सगळं ' पॅटर्न ' म्हणून मान्य करायचं. नुसतं मान्य करून थांबायचं असेल तर फार नफ्फड व्हावं लागतं. गेंड्याची कातडी..... ओह नो ! गेंडाही जिव्हाग्री बाण लागला तर मरतो. रंग कोणताही असो. मूळ रंग स्वार्थाचा. तो झाकायला. तोही पॅटर्न. पण ज्याला तो पॅटर्न शरीराला, मन आणि बुद्धी पणाला लाऊन सांभाळावा लागतो तो त्या पॅटर्नच किती काळ कौतुक करील? विषारी सापाचा दंश झाल्यावर, त्या सापाच्या हिरव्यागार रंगाचं आणि चावल्याचं कौतुक राहील काय?
वपुर्झा /122/Surendra /13032025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा